रेल्वेने अवैध मादक पदार्थांची तस्करी होत आहे. त्यामुळे रेल्वे पोलीस सतर्क असून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी गाड्यांची गोंदिया रेल्वे पोलीस तपासणी करत आहेत.
अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
गांधिधाम एक्सप्रेस ही गोंदिया रेल्वे स्थानकावर आली असताना, रेल्वे पोलीसांनी रेल्वेमध्ये तपासणी केली. त्यावेळी एक बॅग बेवारसरित्या पडून असल्याचे आढळून आले. ही बॅग कुणाची आहे, असे रेल्वे प्रवाशांना विचारले असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पोलिसांनी बॅगची झडती घेतली असता, बॅगमधून गांजासारखा वास येणारा मादक पदार्थ असल्याचे आढळून आले. याची अंदाजी किंमत 55 हजारांच्या जवळपास आहे. त्यामुळे रेल्वे पोलीसांनी बॅग ताब्यात घेत, अज्ञात आरोपीविरुध्द अमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर नेमकी ही बॅग कुणाची आहे. याचा तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
( हेही वाचा: मुळशी तालुक्यात ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघात; तिघांचा जागेवरच मृत्यू )
Join Our WhatsApp Community