वैभववाडी तालुक्यात दिवसभर मुसळधार पाऊस पडतो आहे. यामुळे वैभववाडीत रेल्वे स्टेशन रुळावर पाणी भरल्याने रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू होती. वैभववाडी–तळेरे मार्गावर ठिकठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचबरोबर उंबर्डे – वैभववाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पावसाचा फटका करुळ घाटमार्गाला देखील बसला. करुळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.
( हेही वाचा : प्रशासन अलर्ट मोडवर! कोकणात मुसळधार पाऊस; वाहतूक ठप्प, नागरिकांना सतर्कतेचा इशारा)
वैभववाडीत रेल्वे रुळावर पाणी
वैभववाडी तालुक्यातील सुख व शांती या प्रमुख नद्या चालू वर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत होत्या. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका रेल्वे प्रशासनालाही बसला. वैभववाडी रेल्वे स्टेशनजवळ रुळावर पाणी भरल्यामुळे दोन्ही रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले होते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. मात्र काही काळाने पाणी ओसरले. त्याचबरोबर तळेरे – वैभववाडी मार्गावर घंगाळे जवळ रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाचा जोर असा कायम राहिला तर कोकणात पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाढत्या पावसामुळे कोकणात NDRF ची पथकं दाखल झालेली आहे.
Join Our WhatsApp Community