१६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झालेल्या साखळी बाॅम्ब ब्लास्टने हादरली मुंबईची लाईफलाईन

149

११ जुलै २००६ हा दिवस कोणाही कधीही विसरु शकणार नाही. तब्बल १६ वर्षांनंतर आजही सर्वांच्या जखमा ताज्याच आहेत. ११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी मुंबईतील उपनगरीय ट्रेनमध्ये पहिला बाॅम्बब्लास्ट झाला आणि हा धमाका मुंबईकरांना सुन्न करुन गेला. त्यानंतर काही मिनिटांमध्येच एकामागून एक ७ बाॅम्बब्लास्ट झाले आणि यात २०९ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, तर ८२४ जण जखमी झाले.

New Project 2022 07 09T173129.714

हे सगळे बाॅम्बस्फोट मुंबईमधील पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर अथवा ट्रेनमध्ये झाले. खार रोड, जोगेश्वरी, माहिम, मीरा रोड, माटुंगा रोड, बोरीवली, वांद्रे या ठिकाणी हे स्फोट झाले आणि या स्फोटानंतर मुंबईच नाही तर देश हादरून गेला.

New Project 2022 07 09T173228.419

बेस्ट मदतीला धावून आली

मुंबईत झालेल्या या साखळी बाॅम्बस्फोटामुळे मुंबईकरांच्या पायाखालची जमीनची सरकली. या बाॅम्बस्फोटानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती. हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले. प्रशासनाने या नागरिकांची शाळा-काॅलेजांमध्ये तात्पुरती व्यवस्था केली. बेस्टनेही प्रसंगाचे गांभीर्य ओळखून प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने आपल्या सर्व बसेस रस्त्यावर आणल्या होत्या. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मृतांच्या कुटुंबियांना 1 लाख तर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाईची घोषणा केली. तसेच, तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी मृतांच्या कुटुंबियांसाठी 5 लाख आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना रेल्वेत नोकरी देण्याची घोषणा केली.

New Project 2022 07 09T173327.962

( हेही वाचा: फक्त औरंगाबाद आणि उस्मानाबाद नव्हे; तर भारतातल्या ‘या’ शहरांचीही बदलण्यात आली नावे )

योजनाबद्धरित्या रचला कट

बाॅम्बस्फोटासाठी ‘सिमी’ आणि ‘लष्कर’ या अतिरेकी संघटनांनी योजनाबद्धरित्या तयारी करुन हे स्फोट घडवून आणले, घटनेनंतर एटीएसने 13 जणांना अटक केली. एटीएसकडून अटकेतल्या 13 आणि फरार 15 आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले. 11 सप्टेंबर 2015 रोजी विशेष न्यायालयाने 13 आरोपींना दोषी ठरवले आणि 30 सप्टेंबर 2015 रोजी न्यायालयाने कमाल अहमद अन्सारी, मोहंमद फैजल शेख, एहत्तेशाम सिद्धीकी, नावेद हुसेन खान, असिफ खान या पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली, तर तन्वीर अहमद अन्सारी, मोहंमद माजिद शफी, शेख आलम शेख, मोहंमद साजिद अन्सारी, मुझ्झमील शेख, सोहेल मेहमूद शेख, अहमद शेख या सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली.

New Project 2022 07 09T173428.475

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.