Bmc election : वांद्रे- सांताक्रुझ पूर्वेची काय आहे स्थिती

118

मुंबईतील वांद्रे पूर्व ते सांताक्रुझ पूर्व या महापालिकेच्या एच पूर्व विभागात १० प्रभागांपैंकी ६ प्रभाग हे महिला आरक्षित झाले असून ४ प्रभाग हे सर्वसाधारण अर्थात खुला प्रवर्ग झाले आहेत. मात्र, या आरक्षणाचा फटका माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि माजी सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांना बसला आहे, या दोन्ही प्रमुख नेत्यांचे प्रभाग हे महिला आरक्षित झाल्याने पक्ष यांचे पुनर्वसन कुठे करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मागील निवडणुकीत या प्रभागात चार प्रभाग खुले होते, तर ओबीसीचे दोन अणि ओबीसी महिला आरक्षित असे प्रभाग होते. तर दोन प्रभाग महिला राखीव आणि एक प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रभाग राखीव होता. तर आगामी निवडणुकीत सहा प्रभाग महिला राखीव आणि चार प्रभाग खुला प्रवर्ग राखीव झाले आहे. आजुबाजुचे प्रभाग महिला राखीव झाल्याने आसपासच्या प्रभागात जाण्याचेही मार्ग बंद झाले आहे.

( हेही वाचा : डांबरी रस्ते, खड्डयास काळ)

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सदानंद परब,चंद्रशेखर वायंगणकर आणि हाजी हालिम खान या शिवसेनेच्या चारही नगरसेवकांचे प्रभाग महिला आरक्षित झाले आहे.तर शिवसेनेचे दिनेश कुबल यांचा प्रभाग खुला झाल्याने तसेच रोहिणी कांबळे यांचा प्रभाग महिला झाल्याने दोन्ही नगरसेवक सेफ झोनमध्ये आहेत. मागील निवडणुकीत ओबीसी महिला प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या तुलिफ मिरांडा यांचा प्रभाग महिला राखीव झाल्याने त्याही सुरक्षित झोनमध्ये आहेत. शिवसेनेच्या प्रज्ञा भूतकर यांचा प्रभाग खुला झाल्याने माजी नगरसेवक दिपक भूतकर यांचा परतीचा मार्ग खुला झाला आहे.

जातप्रमाणापत्र अवैध ठरल्याने अपात्र ठरलेल्या शिवसेनेचे सगुण नाईक यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसचे रफिक शेख यांची महापालिका सदस्य म्हणून निवड झाली होती. मागील निवडणुकीत हा प्रभाग ओबीसी करता राखीव असला तरी यावेळेला तो खुला झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून पुन्हा सगुण नाईक किंवा सदानंद परब या दोघांपैंकी कुणावर पक्ष विश्वास टाकतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. तर गुलनाझ कुरेशी यांचा प्रभागही आता खुला झाल्याने तेथील मुस्लिम कार्ड लक्षात घेता एमआयएम, समाजवादी पक्ष तसेच काँग्रेस कुणाला पुढे करतात याकडेही लक्ष आहे.

जुने व नवीन प्रभाग क्रमांक व आरक्षण

  • प्रभाग ८७, खुला प्रभाग, विश्वनाथ महाडेश्वर,नवीन प्रभाग क्रमांक ९६, आरक्षण :महिला
    नवीन प्रभाग रचना : गोळीबार रोड, व्ही एन देसाई रुग्णालयाचा परिसर, गुरुनारायण रोड, पश्चिम द्रुतगती महामार्ग
  • प्रभाग ८८, खुला प्रभाग, सदानंद परब,, नवीन प्रभाग क्रमांक ९०, आरक्षण :महिला
    नवीन प्रभाग रचना : पश्चिम द्रुतगती महामार्गापासून सांताक्रुझ आग्रीपाडा, डवरीनगर ,प्रतीक्षा नगर, शिवाजी नगर,
  • प्रभाग ८९,ओबीसी, दिनेश कुबल,, नवीन प्रभाग क्रमांक ९१, आरक्षण :खुला
    नवीन प्रभाग रचना : एअर रोड, पीएनटी रोड व छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या कुंपण भिंतीच्या जंक्शनपासून वाकोला पाईप लाईन रोडपर्यंत, अशोक नगर, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअर पोर्ट
  • प्रभाग ९०,ओबीसी महिला, तुलिप मिरांडा,, नवीन प्रभाग क्रमांक ९२, आरक्षण :महिला
    नवीन प्रभाग रचना : कलिना, पी एँड टी कॉलनी, कोर्वे नगर, आय ए स्टाफ क्वॉटर्स, सुंदर नगर रोड क्रमांक २,
  • प्रभाग ९१, ओबीसी, सगुण नाईक,रफिक अहमद, नवीन प्रभाग क्रमांक ९३, आरक्षण : खुला
    नवीन प्रभाग रचना : बीकेसी, मुंबई विद्यापीठ परिसर, हिंद नगर, मथुरादास कॉलनी, मिठी नदी, वाकोला नाला, भारत नगर रोड
  • प्रभाग ९२, महिला, गुलनाझ कुरेशी,, नवीन प्रभाग क्रमांक ९४, आरक्षण : खुला
    नवीन प्रभाग रचना : वांद्रे भारत नगर, पथ्थर नगर, बीकेसी, संत ज्ञानेश्वरनगर मार्ग, शारदा देवी रोड
  • प्रभाग ९३, एससी महिला, रोहिणी कांबळे,, नवीन प्रभाग क्रमांक ९५, आरक्षण : महिला
    नवीन प्रभाग रचना : एमआयजी कॉलनी, सरकारी वसाहत, कलानगर आदी परिसर
  • प्रभाग ९४,महिला, प्रज्ञा भूतकर, नवीन प्रभाग क्रमांक ९७, आरक्षण :खुला
    नवीन प्रभाग रचना : सांताक्रुझ जवाहर नगर, पटेल नगर, संत ज्ञानेश्वर रोड
  • प्रभाग ९५, खुला, चंद्रशेखर वायंगणकर,, नवीन प्रभाग क्रमांक ९८, आरक्षण : महिला
    नवीन प्रभाग रचना : खेरवाडी, निर्मल नगर, शिवाजी गार्डन, खेरवाडी रोड, गोळीबार रोड,
  • प्रभाग ९६, खुला हाजी हालिम खान, नवीन प्रभाग क्रमांक ९९, आरक्षण : महिला
    नवीन प्रभाग रचना : बेहरामपाडा, घास बाजार, बस डेपा, अनंत काणेकर मार्ग, डायमा मार्ग, खार रेल्वे लाईन पूर्व पादचारी पुलापर्यंत
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.