राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे, असे असले तरी त्याचे प्रमाण हे कमी-अधिक आहे. गेल्या 3 दिवसांपासून पश्चिम विदर्भात मुसळधार पाऊस झाला असून, पिकांचे तर नुकसान झालेच आहे शिवाय या विभागात मनुष्यहानीही झाली आहे. 1 जून ते 8 जुलै दरम्यान, झालेल्या नुकसानीचा अहवाल धक्कादायक आहे. या दरम्यानच्या काळात पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये 24 नागरिकांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला आहे. तर 18 हजार हेक्टरवरील पिके ही पाण्यात असून, या हंगामात आतापर्यंत 35 जनावरे ही वेगवेगळ्या कारणाने दगावली आहेत.
पश्चिम विदर्भातील स्थिती
1 जूलैपासून पाऊसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. शेतीदेखील खरडून गेल्या आहेत. तसेच, 24 नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार, पश्चिम विदर्भात 1 जून ते 8 जूलै दरम्यान, 18 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.
( हेही वाचा Shivsena: शिवसेनेचे हकालपट्टीचे सत्र सुरुच; आता रवींद्र फाटक आणि राजेश शहांवर कारवाई )
विदर्भातील 111 गावे प्रभावित
मागच्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य असल्याने आता पाणी पातळीत वाढ झाली आहे. लहान- मोठे नदी, नाले आणि तलाव हे तर तुडुंब भरले असले तरी अप्पर वर्धा धरणाची पाणी पातळी मंद गतीने वाढत आहे. पावसामुळे पश्चिम विदर्भातील 111 गावे देखील प्रभावित झाली आहे.
Join Our WhatsApp Community