Hair Care Tips: ‘या’ 4 टिप्स फाॅलो करत, तुमचे केस ठेवा काळे आणि मजबूत

85

सौंदर्य खुलवण्यात केसांचा मोठा वाटा असतो. वेळेत आहार न घेणे, वाढते प्रदूषण आणि केसांवर वापरले जाणारे केमिकल बेस उत्पादने यामुळे केस कोरडे आणि निर्जीव बनतात. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण केसांवर विविध केमिकल बेस ट्रिटमेंट करतो. त्याने केस आतून कमकुवत आणि निर्जीव बनतात. त्यामुळे या 4 टिप्स फाॅलो करत, तुम्ही तुमचे केस काळे आणि मजबूत बनवू शकता…

हेअर मास्क

केस मऊ आणि चमकदार होण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्कचा वापर करा.

तेल लावून हळुवार मसाज करा

डोक्यावर तेल लावून आपल्या बोटांनी हळुवार मालिश करावी. मालिश केल्यामुळे डोक्याच्या त्वचेचे रक्ताभिसरण सुरळित होते. डोक्याची मालिश साधारण 10 ते 15 मिनिटे करावी. हाताच्या तळव्याने डोके रगडू नये. त्यामुळे केस तुटण्याची भीती असते.

वाफाळलेला टाॅवेल केसांना बांधा

केसांना मसाज केल्यानंतर, गरम पाण्यात भिजवलेला वाफाळता टाॅवेल दोन ते तीन मीनिटे डोक्याभोवती गुंडाळून ठेवावा. यामुळे तेल डोक्यात व्यवस्थित मुरते. असं करताना टाॅवेलचं तापमान मध्यम ठेवा. खूप जास्त गरम टाॅवेलमुळे केसांना इजा होऊ शकते.

( हेही वाचा: फिरायला जाताय? ‘या’ जिल्ह्यात ट्रेकिंगसह कॅम्पिंगला बंदी; वनविभागाने पर्यटकांना जारी केल्या सूचना )

केस थंड पाण्याने धुवा

केस धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करा. थंडीच्या दिवसांतदेखील गरम पाण्याचा वापर टाळा. गरम पाण्याने केस दुबळे, शुष्क आणि रखरखीत होतात. तसेच केस गळायला सुरुवात होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.