शीतल म्हात्रे शिंदे गटात सहभागी, शिवसेनेला धक्का

104

शिवसेनेतील शिंदे गटाचा प्रभाव आता महापालिका पातळीवर होऊ लागला आहे. त्याचा पहिला परिणाम मुंबईत दिसून आला आहे. मुंबईतील दहिसर पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका शीतल म्हात्रे या मंगळवारी, १२ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला दहिसर भागात मोठे नुकसान होणार आहे.

आमदारांपाठोपाठ आता नगरसेवकही शिंदे गटात 

मुंबईतील शिवसेनेच्या पहिल्या नगरसेविका आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्यामुळे मुंबई महापालिकेत शिवसेनेला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. शीतल म्हात्रे या दहीसर पश्चिम येथील वॅार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका आहेत. शीतल म्हात्रे दोन वेळा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. शिवसेना प्रवक्ते पदी शीतल म्हात्रे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबईतील आमदारांपाठोपाठ आता नगरसेवक ही एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शीतल म्हात्रे यांचा एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभाग झाल्याचे सांगितले जात आहे. दोनच दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दहीसर, बोरिवली आणि मागाठाणे मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली होती. त्यानंतरही शिवसेनेत राजकीय फुट सुरुच आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचा मोठा फटका शिवसेनेला बसला आहे. राज्यातील मविआ सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. सत्तांतर होताच ठाणे, नवी मुंबई, अंबरनाथमधील नगरसेवकांनी थेट एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेतून मोठे समर्थन मिळताना दिसून येत आहे.

(हेही वाचा युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल होणार, काय म्हणतात पोलीस?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.