मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिली? न्यायालयाचे चौकशीचे आदेश

111

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना संपत्तीबाबत चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप करीत एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत पुणे न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

( हेही वाचा : राष्ट्रपती निवडणूक : मतपेटीच्या वाहतुकीसाठी विधानभवन ते मुंबई विमानतळापर्यंत मार्गिका राखीव ठेवणार)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचा आरोप करीत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभिषेक हरदास यांनी पु्ण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेऊन (सी.आर.पी.सी २०० अन्वये) साक्षी पुरावे तपासण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आरोप काय?

  • शिंदे यांनी २०१९ च्या नमुना २६ भाग -अ/नामनिर्देशन पत्रात आर्माडा एम.एच-०३-एम-२३८८ ही गाडी दिनांक ३० जानेवारी २००६ रोजी ९६ हजार ७० रुपयांत खरेदी केल्याचे म्हटले आहे. तर सन २०१४ साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हेच वाहन ८ लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय २०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार स्कॉर्पियो एम.एच- ०४-एफ.एम-२८९ ही गाडी २४ एप्रिल २००६ रोजी १ लाख ३३ हजार रुपयांना खरेदी केली. तर २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी हीच गाडी ११ लाख रुपयांत खरेदी केल्याचे नमूद केले आहे.
  • २००९ आणि २०१४ च्या नमुना २६ भाग -अ/नामनिर्देशन पत्रात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीकडे शेतजमीन नसल्याचे नमूद केले आहे. तर सन २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात पत्नीने सर्वे नंबर : ८४४,८४५ चिखलगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथे ६/८/२००९ रोजी जमीन खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी व त्यांच्या पत्नीने २०१४ व २०१९ मधील प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाच्या स्तोत्रांच्या तपशिलात ते शेतकरी असल्याचे कोठेही नमूद केले नाही.
  • २०१४ च्या प्रतिज्ञापत्रात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीकडे वाणिज्य इमारत नसल्याचे म्हटले आहे. तर २०१९ च्या प्रतिज्ञापत्रात पत्नीने दुकानाचा गाळा – ००७ प्लॉट नंबर बी-५१ , रोड नं ३०, वागळे इस्टेट ठाणे येथे २० नोव्हेंबर २००२ रोजी वाणिज्य इमारत खरेदी केल्याचे नमूद केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.