सैराटमधील ‘या’ अभिनेत्याला रिक्षावाल्याने लुटलं, FB पोस्ट लिहिली अन् म्हणाला…

97

मुंबई, पुणे नाशिक सारख्या मोठ्या शहरात रिक्षावाल्यांकडून होणारा मनस्ताप किंवा लूट सर्वसामान्य लोकांसाठी आजचा विषय नाही. प्रवाशांकडून कधी जास्त भाडं आकारणं तर कधी प्रवाशांशी गैर वर्तन करणं असे प्रकार रोजच होत असतात. मात्र पुण्यात सैराटमधील एका अभिनेत्याला अशाच प्रकारच्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. नागराज मंजुळेंचा गाजलेला आणि चर्चेत राहिलेला मराठी चित्रपट सैराट. या चित्रपटात परशाच्या जवळच्या मित्राची (सल्या) भूमिका साकारणाऱ्या अरबाज शेख म्हणजेच सल्याने त्याच्या सोबत घटलेल्या प्रकाराबद्दल फेसबूकवर संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर त्याने फेसबूकवर एक अनुभवही शेअर केला आहे.

(हेही वाचा – चुकूनही ‘हे’ APP डाऊनलोड करू नका, अन्यथा…; WhatsApp ने दिला इशारा)

अरबाज हा सध्या पुण्यातच राहतो आहे. पुण्याहून गावी निघाला असताना स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने रिक्षा पकडली. यावेळी त्याला धक्कादायक अनुभव आला. रिक्षाचालकाने रिक्षा चुकीच्या रस्त्यावरून फिरवत अधिकचे पैसे उकळले. यासह त्याने विनाकारण शिवीगाळ केला. हा धक्कादायक अनुभव त्याने एका पोस्ट मधून व्यक्त केला आहे. शिवाय प्रशासनाकडूनही त्याने मदत मागितली आहे.

काय आहे फेसबूक पोस्ट

पुण्यात रिक्षा वाल्यांकडून लूट… सगळेच रिक्षावाले असे असतील असे नाही
नाव. असिफ मुल्ला- रिक्षा नंबर MH 12 NW 9628
nanded city to pune station 198 रुपये होतात.
मी कधीच ola, uber, rapido असले ॲप वापरत नाही.

पाऊस चालू होता. मित्राला म्हणालो पाऊस चालू आहे कुठे सोडायला येतो आणि परत पावसात ये-ये आणि जा-जा …माझ्या मित्राने मला रिक्षा करून दिली rapido ॲप वरून.

पाऊस चालू होता. नांदेड सिटी मधून रिक्षा निघाली. त्याने मला खूप फिरवले. मी त्याला सांगितलं दादा तू खूप फिरवतो, त्या वर त्याने काही उत्तर दिले नाही. 60 रुपये एक्स्ट्रा मागायला सुरुवात केली . मी म्हणलो. का? मी त्याला विचारलं असता त्याने मला शिवी दिली. पाऊस चालू आहे तू इथेच उतर, जास्त बोलू नको… मी रोज रिक्षा चालवतो तू नही…

तुला 60 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील, नही तर इथेच उतर….. मी उतरू शकत नव्हतो आणि मला ट्रेन होती 6 ची. गावी जायचं होत . मी त्याला माझी ओळख सांगितली नाही. माझ्या सारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर अशा समस्येला सामोरे जावे लागत असेल तर गावावरून/ फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील….त्यांची हे लोक किती लूट करत असतील.. हे कुठे तरी थांबल पाहिजे…. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढतील…

sairat

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.