बऱ्याच वेळा कॅब बुक करताना अनेकदा कॅब ड्रायव्हर त्यांच्या मनानुसार प्रवाशांना सेवा द्यायची की नाही हे ठरवतात. मात्र आता OLA, UBER कॅब चालकांना त्यांचा मनमानी कारभार करता येणार नाही. कारण, कॅब एग्रीगेटर्सच्या विरोधात वाढत्या तक्रारी लक्षात घेता सरकारने त्यांची मनमानी रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
…तर होणार कारवाई
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने आता कॅब बुकिंग आणि कॅब रद्द करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता कॅब चालकाने कोणतेही ठोस कारण न देता प्रवाशांची राइड रद्द केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. यासोबतच आता सीसीपीएनेही ग्राहकांना रोख भाडे म्हणजेच कॅश मोडवर पैसे देण्यासही पूर्णपणे बंदी घातली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये सरकारकडे ग्राहकांकडून ओला, उबेर सारख्या कंपन्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यानंतर, CCPA ने कंपन्यांना 10 मे 2022 रोजी या विषयावर बैठक घेऊन या तक्रारींचे निराकरण करण्यास सांगितले होते. यासोबतच या तक्रारींचीही कंपन्यांकडून उत्तरेही मागविण्यात आली होती.
(हेही वाचा – सैराटमधील ‘या’ अभिनेत्याला रिक्षावाल्याने लुटलं, FB पोस्ट लिहिली अन् म्हणाला…)
कोणत्या तक्रारी सर्वाधिक झाल्या
गेल्या काही दिवसांत Ola, Uber सारख्या कॅब कंपन्यांच्या विरुद्धच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ग्राहकांच्या बहुतांश तक्रारी सेवांमधील कमतरता आणि इतर अनुचित व्यापार पद्धतींशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे कॅब चालकांकडून विनाकारण राइड रद्द करणे ही ग्राहकांची सर्वात मोठी तक्रार असल्याचे समोर आले आहे. याशिवाय ठराविक रकमेपेक्षा जास्त भाडे आकारणे, रोखीने भाडे मागणे, प्रवासादरम्यान वाहनात एसी न लावणे अशा तक्रारीही ग्राहकांकडून CCPA ला करण्यात येत आहेत.
Join Our WhatsApp Community