गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडतोय, तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा फटका विद्यार्थ्यांना बसल्याचे समोर आले आहे. राज्यात जोरदार पाऊस पडत असल्याने पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कधी होणार परीक्षा?
राज्यातील अतिवृष्टीमुळे २० जुलै रोजी होणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली असून ती परीक्षा आता ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
(हेही वाचा – मीरा-भाईंदरमधील शिवसेनेचे १८ नगरसेवक शिंदे गटात!)
शिष्यवृत्तीसाठी नोंदणी झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची आकडेवारी
- – एकूण नोंदणी केलेल्या शाळा : ४८,०८०
- – इयत्ता पाचवीचे विद्यार्थी : ४,१७,८९४
- – इयत्ता आठवीचे विद्यार्थी : ३,०३,६९७
- – एकूण विद्यार्थी : ७,२१,५९१
- – परीक्षा केंद्रांची संख्या : ५,७०७