मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विधानसभेतील भाषणाची राज्यभर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेत विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर शिंदे यांनी केलेलं भाषण अनेकांना भावलं आणि आपलंसं वाटलं. मात्र आता या भाषणाची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुंबईतील एका कार्यक्रमात ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी शिंदे यांचे हे पूर्ण भाषण ऐकलं आणि कौतुक केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले भाषण स्वतः नरेंद्र मोदींनाही आवडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदेंच्या विधानसभेतील भाषणाचं कौतुक केलं. मुंबईत गुरूवारी मध्यरात्री झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा त्यांना फोन आला असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
(हेही वाचा- High Court Verdict: पत्नीने मंगळसूत्र काढणं ही पतीसाठी मानसिक क्रूरता!)
पंतप्रधान मोदी एकनाथ शिंदेंना म्हणाले की, मी तुमचं भाषण १ तास १३ मिनिटं १५ सेकंद पूर्ण ऐकलं आहे. मनापासून तुम्ही बोललात असे त्यांनी सांगितले. यावर शिंदे म्हणाले, खूप मनापासून भाषण केल्याचं सांगत मोदींनी कौतूक केलं. पण मी त्यांना म्हणालो, मी कागद घेऊन आलो होतो, पण बोलताना सगळं बाजूला ठेवलं. मी त्यादिवशी १० टक्केच बोललो ९० टक्के पोटात आहे. योग्य वेळी बरेच काही बोलेन, अशी ग्वाही शिंदे यांनी पंतप्रधान मोदींना दिली.
Join Our WhatsApp Community