बेस्टने ईव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिलेले २१०० ई- बसचे कंत्राट रद्द करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तेक्षेप करावा, अशी विनंती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.
बेस्टने नव्या २१०० ई- बस खरेदी करण्याचे कंत्राट ईव्ही ट्रान्स प्रा. ली. या कंपनीला दिले असून या कंत्राटाची निविदा प्रक्रिया चूकीची असल्याची टिप्पणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्यानंतरही बेस्टने हे कंत्राट रद्द केलेले नाही. त्यामुळे याबाबत पुढील कार्यवाही न करता हे कंत्राट रद्द करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदार अँड शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे.
(हेही वाचा – तुम्ही SBI ग्राहक आहात? बँकेने वाढवले कर्जाचे व्याजदर; बघा वाढलले नवे दर)
उलट उच्च न्यायालयाच्या या निकालानंतरही बेस्ट व्यवस्थापन सदर कंपनीलाच कंत्राट मिळावे म्हणून मदत करीत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असून शासनाने तातडीने या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.
(हेही वाचा – पावसाळ्यात रेल्वे सेवा खंडित झाल्या, तर असतील ४०० बेस्ट आणि ११ एसटी बसेस सेवेत)
Join Our WhatsApp Community