मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिल्यामुळे, शिवसेना नेते विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. यावर आता पलटवार करत शिवतारे यांनी ठाकरे यांच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. आम्हाला महाविकास आघाडी मान्य नाही. शिवसेनेने आघाडी तोडावी अशी भूमिका मी 29 जूनला पत्रकार परिषद घेत मांडली होती. तसेच, शिवसेनेत उभी फूट पडण्यास शिवसेना नेते संजय राऊतच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच सर्व काही घडत आहे. त्यांची उद्धव ठाकरेंबाबतची निष्ठा किती आणि शरद पवारांबाबतची निष्ठा किती हे सर्वांना माहिती आहे, असा पलटवार शिवतारे यांनी केला.
( हेही वाचा: ‘शिवसेनेच्या पंखाखाली राहून आपला स्वाभिमान जपू नये’, राऊतांचा शिंदे गटाला टोला )
माझी काय हकालपट्टी करणार, मीच शिवसेनेतून बाहेर पडलो
29 जून रोजी पत्रकार घेऊन मी भूमिका मांडली आहे. त्यात एकच गोष्ट होती. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही शिवसेनेतच आहेत. आम्हाला काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचे नाही. उद्धव ठाकरेंनी आघाडी तोडावी सर्व काही ठिक होईल. एकनाथ शिंद यांनी तेच सांगितले होते. मी माझी भूमिका स्पष्टच केली होती. माझी काय हकालपट्टी करणार. मीच सेनेतून बाहेर पडलो होतो, अस विजय शिवतारे म्हणाले.
Join Our WhatsApp Community