सेटलवाड व पटेलांनी रचले होते मोदींच्या विरोधात षडयंत्र

95

काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल, तिस्ता सेटलवाड आणि इतरांनी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा कट रचल्याची माहिती विशेष तपास पथकाने शुक्रवारी कोर्टात दिली. यासंदर्भात एसआयटीने सेशन कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार, तत्कालिन गुजरात सरकार पाडण्यासाठी हे कारस्थान आखण्यात आले होते. सेटलवाडच्या जामिनाला विरोध करताना अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, गुजरातची प्रतिमा खराब करण्यासाठी कट रचला गेला होता. यासाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा सहभाग होता. ते तेव्हा राज्यसभा खासदार आणि काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागर होते. गुजरातमधील निवडून आलेले तत्कालिन सरकार पाडणे हे सेटलवाड यांचे राजकीय ध्येय होते. विरोधीपक्षाकडून त्यांना यासाठी अवैध मार्गानं 30 लाख रुपये मिळाले होते. विरोधी पक्षाकडून सेटलवाड यांना गुजरातमधील विविध अधिकारी आणि निरपराध लोकांना विविध प्रकरणांमध्ये अडकवणे आणि त्यांच्यावर खटले चालवण्याचं त्या काम करत होत्या. यामध्ये नरेंद्र मोदीदेखील त्यांच्या टार्गेटवर होते. याप्रकरणी तिस्ता सेटलवाड, माजी आयपीएस अधिकारी आरबी श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांना अटकही करण्यात आली होती.

( हेही वाचा: लोकभावना लक्षात घेऊन बाळासाहेबांऐवजी दि.बा. पाटलांचे नाव – मुख्यमंत्री )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.