फेसबुक वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर आणण्याची तयारी मेटाने चालवली आहे. यात वापरकर्ते एकाच फेसबुक अकाउंटमधून 5 प्रोफाईल बनवू शकतील. या फीचरची सध्या चाचणी घेतली जात आहे.
ही आहे खास सोय
या चाचणीत सहभागी झालेल्या वापरकर्त्यांना एकाच अकाउंटमधून 5 प्रोफाईल बनवण्याची सुविधा मिळत आहे. नवी प्रोफाईल बनवताना वापरकर्त्यांस खरे नाव सांगण्याचीही गरज नाही. ओळख लपवून कोणत्याही पोस्टवर कमेंट करण्याची सोयही आहे.
( हेही वाचा: झेडपी, आरोग्य विभागात 19 हजार पदे रिक्त; भरतीकडे तरुणांच्या नजरा )
काय आहे धोका?
या फीचरमुळे स्पॅमचा धोका वाढू शकतो. मात्र, मेटाच्या म्हणण्यानुसार, नव्या प्रोफाईलमध्येही वापरकर्त्याला फेसबुकचे आताचे धोरण पाळावे लागेल. उल्लंघन केल्यास वापरकर्त्यांच्या मूळ अकाउंटवर परिणाम होऊ शकतो. फेसबुकच्या म्हणण्यानुसार, वेगळ्या ओळखीसोबत वापरकर्त्यांस वेगळ्या श्रेणीतील फिड मिळेल. एखाद्या वापरकर्त्यांस गेम आणि प्रवास या दोन्हीमध्ये रस असेल, तर तो तशा 2 प्रोफाईल बनवू शकेल आणि स्वातंत्र्यपणे वेगळ्या लोकांना फाॅलो करु शकेल.
Join Our WhatsApp Community