मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, म्हणाले “14 खासदारच नव्हे तर”…

88

महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री 2 च्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करत शिंदे गटाने आपली स्वत:ची कार्यकारणी जाहीर केली. दिल्लीत दाखल झाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वकिलांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच, खासदारांबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेचे 14 नव्हे, तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून, त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

( हेही वाचा: राष्ट्रवादी कॉंग्रेसची ‘सुपर १००’ ही संकल्पना आणि ॠतिक रोशनचा सुपर ३० चित्रपट… )

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

शिवसेनेचे खासदारही पक्षाविरोधी भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे. शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत. सर्वजण येणार असून आपण त्यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सध्या खूप चर्चा सुरु आहेत, पण मला अद्याप काही माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले. खासदारांसोबत भेट झाल्यानंतर, अधिक माहिती देऊ असेही शिंदे यांनी सांगितले. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत असून, सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निकाल येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.