कुत्र्याला फिरवण्यासाठी खेळाडूंना घरी पाठवणं ‘त्या’ IAS अधिकाऱ्याला भोवलं; तात्काळ बदली

115

दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये खेळाडूंचा सराव थांबवून कुत्र्यासोबत फिरल्यामुळे वादात सापडलेले आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांची दिल्लीहून लडाखमध्ये बदली केली आहे. तसेच त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची यांचे अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता आणि अहवाल आल्यानंतर गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण

दिल्लीचे आयएएस संजीव खिरवार हे साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या कुत्र्यासह फिरण्याकरता दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये येत असतात. त्यामुळे 7 वाजताच त्याठिकाणी सराव करणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेर काढले जात असल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकाराबाबत खेळाडूंसह प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकाराबद्दल एका कोचने माहिती दिली. त्यांनी असे सांगितले की, ‘आधी याठिकाणी साडे आठपर्यंत अॅथलिट्स सराव करत असत, पण आता 6.30 वाजल्यापासूनच मैदान रिकामं करण्यासाठी गार्डकडून सांगितले जात होते. त्यामुळे आता त्यांना 3 किमीवरील जवाहरनगर स्टेडियममध्ये जावं लागत होते.

(हेही वाचा – एसटी बस २० फूट दरीत कोसळली, १५ गंभीर जखमी प्रवाशांवर उपचार सुरू)

हा प्रकार समोर येताच दिल्ली सरकारने दिल्लीतील सर्व स्टेडियम रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहतील. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. दरम्यान, संजय खिरवार यांनी असे सांगितले की, मी कधी कधी माझ्या कुत्र्याला फिरवण्यासाठी मैदानावर घेऊन जातो. पण खेळाडूंना कोणता त्रास होणार नाही, याचीही काळजी घेतो. असे म्हणत त्यांनी हे आरोप खोटे असल्याचेही सांगितले.

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

दिल्ली सरकार संचालित त्यागराज स्टेडियममधील प्रशिक्षण वेळेपूर्वी संपुष्टात आणल्याच्या खेळाडूंच्या तक्रारी समोर आल्यानंतर अरविंद केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टची दखल घेत दिल्लीच्या खेळाडूंना मोठा दिलासा देत अरविंद केजरीवाल सरकारने आता दिल्लीतील सर्व स्टेडियम रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहतील अशी घोषणा केली आहे. केजरीवाल सरकारच्या या घोषणेनंतर आता खेळाडूंना रात्री दहा वाजेपर्यंत सराव करता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.