गेल्या काही दिवसांपासून सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी पुकारलेला बेमुदत संप कोणत्याही क्षणी मागे घेतला जाऊ शकतो. मंगळवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेशी बैठक घेतल्यानंतर संप मागे घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.
( हेही वाचा : मेट्रो स्थानकांपर्यंत नवे ‘बेस्ट’ मार्ग सुरू करण्याची मागणी)
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर भूमिका जाहीर करू
राज्यभरातील बहुतांश सरकारी रुग्णालयातील परिचारिका आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून संपावर गेल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख लातूरला असल्याने बैठक लातूरला आयोजित करण्याची योजना होती. मात्र परिचारिका संघटनांनी लातूरमध्ये बैठकीसाठी बोलावले गेले नसल्याचे सांगितले. प्रशासकीय बदल्या रद्द करणे, कंत्राटीपद्धतीने रिक्त पदांवर परिचारिकांची नियुक्ती या दोन प्रमुख मागण्यांवर परिचारिकांनी काम बंद आंदोलन बुधवारपासूनच सुरु केले होते. या दोन मागण्यांसह इतर अनेक मागण्यांवर आज मंत्रालयात अमित देशमुख यांच्याशी सकारात्मक पातळीवर चर्चा झाली. परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्या सरकारच्यावतीने रद्द केले जात असल्याचे आश्वासन आम्हांला अमित देशमुख यांनी दिले. इतर मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आम्ही भूमिका जाहीर करु, असे परिचारिका संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community