यंदाच्या पावसाळ्यासाठी रेल्वे सज्ज झाली आहे. पावसाळ्याच्या एक महिन्याआधीच मध्य आणि पश्चिम रेल्वेने विविध कामांना सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा रेल्वे पाण्याखाली जाणार नसल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. नाले, गटारांची सफाई करतानाच पाणी उपसा करण्यासाठी पंपही बसवण्यात आला आहे. पावसाळ्यात तोंड देण्यासाठी रेल्वे सज्ज असल्याची माहिती देण्यात आली. मध्य रेल्वेवर अद्यापही काही कामे सुरु असून, त्यांना गती दिली जात असल्याचे सांगितले.
दरवर्षी पावसाळ्यात मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील रुळ पाण्याखाली जातात. नालेसफाई केल्याचा दावा रेल्वे प्रशासन करते आणि हा दावा खोटा ठरतो. यंदाही पाणी साचून लोकल आणि मेल एक्सप्रेसचे वेळापत्रक विस्कळीत होऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी विविध कामे हाती घेण्यात आली.
( हेही वाचा: शेतक-यांचा पुणतांब्यातून पुन्हा एल्गार; ‘या’ मागण्यांसाठी धरणे आंदोलन )
वर्दळीचे सोळा पादचारी पूल
16 पादचारी पूल, 10 उद् वाहक, 19 सरकते जिने हे गर्दीचे आणि वर्दळीचे असून पावसाळ्यात यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येते. तसेच कोणताही अपघात घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही या ठिकाणी तैनात केले जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community