भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गुजरात किनार्याजवळ अरबी समुद्रात सात खलाशांसह ‘अल नोमन’ या पाकिस्तानी बोटीला पकडले आहे. संरक्षण अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. गुजरात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) गुप्त माहितीच्या आधारे कोस्ट गार्ड जहाज ‘अरिंजय’ने 30 आणि 31 मेच्या मध्यरात्री ही कारवाई केली. एटीएसच्या सखोल चौकशीसाठी बोट ओखा (देवभूमी द्वारका) येथे आणली जात असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
Indian Coast Guard apprehends Pakistani fishing boat with seven crew members in Indian waters in Arabian sea off Gujarat coast: Defence official
— Press Trust of India (@PTI_News) June 1, 2022
तसेच पाकिस्तानी बोटीसोबतच 7 क्रू मेंबर्स देखील भारतीय सीमेवरून ताब्यात घेण्यात आले आहेत. प्रकरण गुजरातमधील द्वारका येथील आहे जिथे भारतीय तटरक्षक दलाने गुजरात एटीएसच्या गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. बोट ताब्यात घेतल्यानंतर ती काल रात्री ओखा येथे आणण्यात आली आहे. आज विविध एजन्सी बोटीची पाहणी करणार असून क्रू मेंबर्सची चौकशी करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – वादळ, मुसळधार पावसामुळे तुमच्या वाहनावर झाड पडले तर नो टेन्शन कारण…)
मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत तस्करीचे कोणतेही साहित्य आढळून आलेले नसून, आज 2 जून रोजी ओखा येथे पोहोचल्यानंतर तिची कसून चौकशी करण्यात येणार आहे. ही संशयास्पद बोट राष्ट्रीय सागरी सीमेजवळ दिसल्यानंतर त्यांना थांबविण्याच्या सूचना दिल्या. यानंतर भारतीय तटरक्षक दलाने समुद्र आणि आव्हानात्मक हवामान असतानाही बोट थांबवली. तपासात ही पाकिस्तानी नौका असल्याचे आढळून आले.
Join Our WhatsApp Community