नागरी विमान वाहतूक महासंचलनालयाने (DGCA) सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून विमान प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चूक केल्याने एअरलाईन्स कंपनी विस्ताराला तब्बल १० लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. DGCA ने एअर विस्ताराने कमी अनुभव असलेल्या वैमानिकाला इंदौरमध्ये फ्लाईट लँडिंग करण्यास लावल्याने हा दंड ठोठावल्याचे सांगितले जात आहे. तसेच, फर्स्ट ऑफिसरला कोणतेही प्रशिक्षणाशिवाय टेक ऑफ आणि लँडिंग क्लिअरन्सच्या उल्लंघनामुळे हा दंड ठोठावल्याचे DGCA ने सांगितले आहे.
… म्हणून एअर विस्ताराला ठोठावला दंड
एअरलाइन्सच्या फर्स्ट ऑफिसरला प्रवाशांना विमान उतरवण्यापूर्वी सिम्युलेटरवर पहिल्यांदा विमान उतरवावे लागते. त्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. फर्स्ट ऑफिसरला विमान उतरण्याची संधी देण्यापूर्वी कॅप्टन सिम्युलेटरवर प्रशिक्षण घेतो. एअर विस्ताराचे हे विमान फर्स्ट ऑफिसरने कॅप्टनशिवाय तसेच सिम्युलेटरचे प्रशिक्षण न घेता उतरवले होते. हे विमान प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळण्यासारखे आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. एअर विस्तारा या विमान कंपनीचा निष्काळजीपणा इंदौर विमानतळावर समोर आला.
(हेही वाचा – DGCA ची मोठी कारवाई, Indigo एअरलाईन्सला ५ लाखांचा दंड)
एअरलाईन्सच्या सेवेवर परिणाम
नुकत्याच विमान प्रवाशांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे स्पष्ट झाले आहे की, कोरोना महामारीनंतर एअरलाईन्सच्या विमान कंपन्यांच्या ग्राहक सेवा आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सर्वेक्षणानुसार विमान कंपन्या प्रवाशांच्या सुविधांशी तडजोड करत असल्याचे 80 टक्के प्रवाशांचे मत आहे. अलीकडेच DGCA ने इंडिगोला रांचीमध्ये दिव्यांगांना विमानात बसू न दिल्याने 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Join Our WhatsApp Community