कोरोना काळात वडाळ्यातील शांतीनगर परिसरानजीकच्या मिठागरांवर माती टाकून तयार झालेले अतिक्रमण गुरूवारी वनविभागाने तोडले. सकाळी ११ ते साडेचारपर्यंत ही कारवाई केली गेली. मिठागरांवर मातीचा भराव टाकून तब्बल ५२ झोपड्या उभारल्या गेल्या होत्या. ८०० चौरस मीटर जागेत मिठागरांवर झालेले अतिक्रमण तोडण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन विभागाकडे संबंधित विभागाने मदत मागितली. त्यानुसार ही कारवाई केली गेली, अशी माहिती कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली. वडाळ्यातील सीटीएस १४४ या भागांत परिसरातील माणसांनी अतिक्रमण केल्याचे आढळून आले होते. केंद्राशी संलग्न असलेल्या मिठागर विभागाने या कारवाई करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन कक्षाची मदत मागितली होती. अखेर आज तीन जेसीबीच्या साहाय्याने २५ वनाधिकारी आणि २५ पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई पूर्ण झाली. यावेळी महानगरपालिका आणि बेस्टचेही कर्मचारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community