मुंबईतील काही भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या चार मिनी पंपिंग स्टेशनचे काम शेवटच्या टप्प्यात असून पुढील १५ दिवसांमध्ये ही सर्व पंपिंग स्टेशन सुरु होणार आहे. माटुंगा येथील गांधी मार्केट आणि हिंदमाता येथील २ मिनी पंपिंग स्टेशन्स यापूर्वीच कार्यान्वित झाले आहे.
( हेही वाचा : मुंबई पोलिसांसाठी आयुक्तांनी घेतला ‘BEST’ निर्णय! )
पाण्याचा निचरा करण्यासाठी ४५६ पंप
मुंबईत पावसाळ्यात पूरपरिस्थिती टाळण्यासाठी पावसाळापूर्व नालेसफाईचे पूर्ण झाले असून ज्या भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होते त्या तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ४५६ पंप बसवण्यात आले आहे असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी दिली आहे. तसेच यासाठी २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत आपत्कालीन व्यवस्थापन प्रणाली कार्यरत करण्ण्यात आली आहे. आतापर्यंत २८२ पूरप्रवण क्षेत्रांचे निवारण करण्यात आले असून आगामी पावसाळ्यापूर्वी ३० पूरस्थितीची ठिकाणे नियंत्रणात आणली जात आहेत.
मिनी पंपिंग स्टेशनचे काम
कला नगरच्या धर्तीवर मिनी पंपिंग स्टेशनचे काम हाती घेत गांधी मार्केट आणि हिदमाता आदी ठिकाणी याची व्यवस्था करण्यात आली आहे.ही दोन्ही पंपिंग स्टेशन्स कार्यान्वित करण्यात आले असून या दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये अनुक्रमे १३ व १५ पंप बसवण्यात आले आहे.
चुनाभट्टी (०६ पंप), महालक्ष्मी (०८ पंप), पी डिमेला रोड यलो गेट(०३), वडाळा भरणी नाका अग्निशमन केंद्र(०२) आदी ठिकाणी ३०००, १००० आणि ५०० अश्वशक्तीचे पंप बसवण्यात येत आहे. याठिकाणच्या पंपिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ जूनपूर्वी सर्व ठिकाणची पंपिंग स्टेशन्स् कार्यान्वित होती,असा विश्वास वेलरासू यांनी व्यक्त केला.
Join Our WhatsApp Community