केंब्रिज, ऑक्सफर्ड विद्यापीठांचा हिंदूफोबिया! विवेक अग्निहोत्रींनी थोपटले दंड 

89

भारताला स्वातंत्र्य मिळून ४३ वर्षे उलटली, त्यानंतरही काश्मीरमधील सुमारे २ लाख काश्मिरी हिंदूंना पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी एका रात्रीत काश्मीर सोडून पळून जाण्यास भाग पाडले. १ लाखाहून अधिक हिंदूंचा वंशविच्छेद केला, मात्र भारतातील मुस्लिमधार्जिण्या काँग्रेस सरकारमुळे जागतिक पातळीवर याची वंशविच्छेद म्हणून नोंद झाली नाही. ३० वर्षांनी का होईना चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची निर्मिती करून अवघ्या जगाला हा वंशविच्छेदच होता, हे पटवून दिले. मात्र त्यांना ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विरोध केला. तसेच केंब्रिज विद्यापीठातही त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले.

विवेक अग्निहोत्री यांचा ३१ मे २०२२ रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठात ‘इंडिया आफ्टर द काश्मीर फाइल्स’ हा कार्यक्रम होता. शेवटच्या क्षणी ऑक्सफर्ड विद्यापीठाने १ जुलैपर्यंत हा कार्यक्रम पुढे ढकलला. याला विवेक अग्निहोत्री यांनी तीव्र आक्षेप घेत या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा केली. विवेक अग्निहोत्री हे सध्या युरोपमध्ये आहेत. ‘इंडिया आफ्टर द काश्मीर फाइल्स’ अंतर्गत त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. त्यांचे सोमवारी, 6 जून रोजी नेहरू सेंटर येथे फिट्झविलियम कॉलेज, केंब्रिज येथे कार्यक्रम होणार आहेत आणि 8 जून रोजी इंग्लंडच्या संसदेत कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातही तेथील विद्यार्थी संघटनांकडून ‘इंडिया आफ्टर द काश्मीर फाइल्स’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु 1 जुलै रोजी पूर्वसूचना न देता शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. विवेक अग्निहोत्री यांनी यांची सोशल मीडियाद्वारे माहिती दिली.

केंब्रिज विद्यापीठ प्रशासन मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर नमले

याविषयी चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी त्यांची भूमिका ट्विटरवरून मांडली. त्यामध्ये अग्निहोत्री म्हणाले की, सध्या मी युरोपमध्ये ‘इंडिया आफ्टर द काश्मीर फाइल्स’ या विषयावर दौरा करत आहे. या दौऱ्याच्या दरम्यान मला केंब्रिज, ऑक्सफोर्ड विद्यापीठ, ब्रिटिश संसद, जर्मनी आणि नेदरलँड यांनी निमंत्रित केले. केंब्रिज विद्यापीठाने मला यानिमित्ताने आधीच निमंत्रित केले, परंतु आयत्यावेळी मला या कार्यक्रमाचे चित्रीकरण करू नका, असे सांगण्यात आले. हे शंभर टक्के विचारस्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. कारण याठिकाणी माझ्याविरोधात काही मुस्लिम संघटनांनी निदर्शने केली. ते काश्मीरमधील वंशविच्छेद नाकारणारे आहेत, धर्मांधवृत्तीचे आहेत. माझ्याविरोधात सोशल मीडियात लिखाण झाले, याच विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस शिकले आहेत, परंतु त्यांच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने ठरवलेला कार्यक्रम रद्द केला, कारण नेताजी हे फॅसिस्ट होते असे कारण देण्यात आले, असे चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री म्हणाले.

(हेही वाचा माफीचा साक्षीदार झाल्याने सचिन वाझे सुटणार आणि अनिल देशमुख अडकणार का?)

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या विरोधात न्यायालयात जाणार 

काही दिवसांपूर्वी मला ऑक्सफोर्ड विद्यापीठाने निमंत्रित केले होते. त्यानुसार आपण ३१ मे २०२२ रोजी तिकडे ‘इंडिया आफ्टर द काश्मीर फाइल्स’ कार्यक्रमासाठी जाणार होतो, तसे ईमेलद्वारे निश्चित झाले होते, मात्र ऐनवेळी मला कळवण्यात आले की, येथील कार्यक्रम रद्द केला आहे, कारण आधीच दुसरा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे आणि त्यांनी मला न सांगता कार्यक्रमाची तारीख १ जुलै २०२२ ही ठरवली, या दिवशी एकही विद्यार्थी विद्यापीठात नसतो. त्यांनी मला विरोध केला नाही, तर लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नरेंद्र मोदी सरकारला विरोध केला आहे. त्यासाठी त्यांनी इस्लामिक फोबिया, धर्मांध असे लेबल लावले आहे. हा फॅसिझम आहे. याच विद्यापीठाने भुट्टोच्या मुलाचे आणि अनेक कट्टरवाद्यांचे कार्यक्रम आयोजित केले होते. मी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. त्यांना हजारो काश्मिरी हिंदूंना ठार करणे हे हिंदूफोबिया वाटत नाही, पण त्यावर चित्रपट बनवला तर त्यांना मुस्लिम फोबिया वाटतो, त्यांनी मला नाकारले नाही तर त्यांनी काश्मीरमधील हिंदू वंशविच्छेद नाकारला आहे. त्यांनी हिंदूंना नाकारले आहे. विशेष म्हणजे ऑक्सफर्ड विद्यापीठात हिंदू अल्पसंख्याक आहेत, त्यामुळे मी याविरोधात उभा राहिलो आहे, मला पाठिंबा द्या, असे आवाहन विवेक अग्निहोत्री यांनी केले.

रश्मी सामंतलाही ऑक्सफर्डमध्ये केले होते लक्ष्य 

विवेक अग्निहोत्री यांच्या आधी ऑक्सफर्ड युनियनच्या डाव्या आणि पाकिस्तान समर्थक विचारसरणीच्या भारतीय विद्यार्थिनी रश्मी सामंतला मानसिक त्रास दिला होता. रश्मी सामंत ही ऑक्सफर्ड विद्यापीठातील पहिली भारतीय महिला जी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आली होती. पण त्यानंतर रश्मीच्या विरोधात डाव्या आणि पाकिस्तानी विचारसरणीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी सोशल मीडियाद्वारे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पण्या केल्या. त्याचा भयंकर मानसिक त्रास होऊन रश्मीने अखेर पदाचा राजीनामा दिला. भारत सरकारनेही या घटनेची दखल घेतली. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या समितीनेही हे मान्य केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.