जातीनिहाय जनगणना होणे आवश्यक असून, राष्ट्रवादीची मागणी आहेच शिवाय तशी भूमिकाही आहे. त्यामुळे पक्षाच्यावतीने सर्वपक्षीय बैठक घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री, खासदार व प्रमुख नेत्यांची आढावा बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित केली होती. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
( हेही वाचा: J&K Target Killing: पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला; परप्रांतीय मजूरांवर गोळीबार, एकाचा मृत्यू )
अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ते निर्णय घेतील
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जिल्ह्याजिल्ह्यात जाऊनही जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. भाजपने राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. भाजपला तो घोडेबाजार अपेक्षित नसावा अशी खात्री आहे. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ते निर्णय घेतील अशी आशाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community