मोदींच्या दौऱ्यादरम्यान कानपूरमध्ये हिंसाचार, दोन समाजात दगडफेक

86

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उसळला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. भाजपच्या महिला नेत्या नुपूर यांच्या वक्तव्यावरून कानपूरमध्ये गदारोळ झाला होता. त्यामुळे कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर दोन्ही बाजूंनी हाणामारी झाली. येथे मुस्लिम समाजाच्या लोकांची पोलिसांशी झटापट झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. विशेष म्हणजे आज शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूरच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान हिंसाचार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी काही स्थानिकांवर लाठीचार्ज केल्यानंतर यतीमखानाजवळील बेकनगंज भागात दोन समाजात हिंसाचार झाल्याचा प्रकार समोर आला. यावेळी दगडफेक देखील करण्यात आली.

(हेही वाचा – Online RTO Service: फक्त Licence नाही, तर या सुविधाही आता ऑनलाईन मिळणार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.