भारतीय टपाल विभागाची यशस्वी झेप! ड्रोनद्वारे पोहोचवले पत्र…

119

भारतीय टपाल विभागाने पहिल्यांदाच गुजराच्या कच्छ जिल्ह्यात एका ड्रोनद्वारे पत्र पोहोचवले आहे. पत्र ट्रान्सफर करण्यासाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला गेला. ड्रोनने केवळ अर्ध्या तासात ४६ किलोमीटरचे अंतर पार करत पत्र पोहोचवले.

( हेही वाचा : ITI विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या कोणत्याही शाखेत प्रवेश मिळणार!)

हा ड्रोन गुरूग्राममधील स्टार्टअप कंपनी टेकईगल TechEgale ने बनवला आहे. पत्र पाठवण्यासाठी या ड्रोनचा पहिल्यांदा वापर केला गेला. ड्रोन डिलिव्हरीच्या तांत्रिक व्यवहार्यतेची चाचणी करणे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश होता.

३ किलो वजनाचे पार्सल डिलिव्हर करण्याची क्षमता 

या ड्रोनची रेंज १०० किमी आणि ताशी वेग १२० किमी असून ड्रोन एकावेळी ३ किलो वजनाचे पार्सल डिलिव्हर करू शकतो. हा ड्रोन पाच बाय पाच मीटर परिसरात हेलिकॉप्टरप्रमाणे टेक ऑफ करू शकतो. या प्रकल्पामुळे भविष्यात सुद्धा ड्रोनद्वारे पत्र पोहोचवणे शक्य होणार आहे. २७ मे रोजी भुज तालुक्यातील हबे गावातून Tech Egale कंपनीच्या व्हर्टीप्लेन X3 ने भारतीय टपाल विभागाचे पत्र कच्छ जिल्ह्यातील भाचानु तालुक्यातील नेर गावात पोहोचवले असे TechEgale चे संस्थापक आणि CEO विक्रम सिंह मीना यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.