‘बेस्ट’च्या प्रत्येक गाड्यांवर वाहन ट्रॅकिंग सिस्टिमची नजर!

104

बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी कामगारांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मागाठाणे आगाराला भेट दिली. आगाराला भेट दिल्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापकांकडून बेस्टच्या नव्या वाहन ट्रॅकिंग प्रणालीविषयी (vehicle tracking system) माहिती घेतली.

( हेही वाचा : MSRTC : मुंबई-पुणे महामार्गावरून धावणाऱ्या शिवनेरी बसची जागा शिवाई घेणार? तिकीट दरही होणार कमी)

बेस्ट करता येणार ट्रॅक

आयटीएस (Intelligent transportation systems) माध्यमातून आता आपल्याला सर्व गाड्या ट्रॅक करता येतात तसेच वाहन ट्रॅकिंग प्रणालीद्वारे बसगाडीचा वेग, कोणत्या स्थानकांवर ही गाडी थांबते, प्रवाशांच्या तक्रारी, गाडी रुटप्रमाणेच सेवा देतेय का, गाडी वेळेवर चालतेय की नाही या सर्व कार्यप्रणालीची माहिती बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी करून घेतली. अगदी कंडक्टर सुद्धा ही VTS सिस्टम ऑपरेट करू शकतात ही अत्यंत कौतुकाची गोष्ट असून कंत्राटी बसेसची माहिती सुद्धा याद्वारे मिळते तसेच बेस्ट उपक्रम प्रवाशांच्या सुरक्षेचीही काळजी घेत आहे असेही त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी कामगारांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ओशिवरा आगाराला भेट दिली होती.

New Project 3 4

आगाराला भेट दिल्यानंतर त्यांनी आगार व्यवस्थापकांना खालील सूचना केल्या…

1) ओशिवरा आगार, सात बंगला बस स्थानक, वर्सोवा बस स्थानक, तसेच अंधेरी बस स्थानक येथील अस्वच्छ शौचालय तसेच नीटनेटके करण्याबाबत आगार व्यवस्थापकांना निर्देश देण्यात आले.
2) ओशिवरा आगारातील बंद असलेली कॅन्टीन व्यवस्था लवकरात लवकर चालू करण्यासाठी तरतूद करावी तसेच सात बंगला बस स्थानक व वेसावे बस स्थानक येथील कॅन्टीन व्यवस्था सुधारण्याबाबत निर्देश देण्यात आले.
3) अंधेरी येथील रोख व तिकीट विभाग येथील ७ ही वेळ वाढवून ७.३० करण्यात आलेली आहे.
4) प्रत्येक महिन्यात रकमेच्या स्वरूपात प्रधान करण्यात येणारे वेतन हे ओशिवारा आगार येथे पाच वाजेपर्यंत प्रदान करण्यात येईल.
5)रजा पास करण्याबाबत सांगण्यात आले आहे.
6) तिकीट व रोख विभाग येथील आसन व्यवस्था सुधारण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.
7) कामगारांच्या खात्यातील रजांबाबत चर्चा करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.