Rajya Sabha Election : हितेंद्र ठाकूर बनणार गेम चेंजर?

130

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची चर्चा जोरदार सुरु झाली, मतांची बेगमी करण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप हे त्यांच्या त्यांच्या परीने करत आहेत. त्यासाठी एक एक मत महत्वाचे ठरणार आहे. त्यासाठी जसे अपक्ष आमदारांची मते महत्वाची आहेत, तसेच छोट्या छोट्या पक्षांची मतेही महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यात बहुजन विकास आघाडीची ३ मतेही महत्वाची ठरणार आहेत. सध्या जरी बविआचा महाविकास आघाडीला पाठिंबा असला तरी राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र बविआ त्यांची ३ मते भाजपाला देईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर राज्यसभेच्या निवडणुकीत गेम चेंजर बनणार आहेत.

बविआचा निर्णय गुलदस्त्यात 

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता, मात्र तो अपयशी ठरला. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांनी अपक्षांची मते आणि छोट्या पक्षांची मते जमवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. १० मे रोजी निवडणूक होणार आहे. यात भाजपा आणि शिवसेना यांच्यात कांटे की टक्कर बघायला मिळणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराची मते महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सध्या पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपले पत्ते अजून खुले केलेले नाहीत. त्यामुळे ही तीन निर्णायक मते कुणाला मिळणार याबाबत आता तर्कविर्तक लावले जात आहेत.  ही तीन मते कुणाला हे अजून, हितेंद्र ठाकूरांनी स्पष्ट केलेले नाही. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील असे तीन आमदार बहुजन विकास आघाडीकडे आहेत.

(हेही वाचा रेल्वेची नवी सुविधा: आता तुमचं स्टेशन आल्यावर रेल्वे करणार तुम्हाला ‘वेकअप काॅल’)

शिवसेनेचा राग काढणार! 

२०१९च्या विधानसभा निवडणुकीत नालासोपारा येथून बविआचा उमेदवार क्षितिज ठाकूर उभे राहिले होते, त्यांच्या विरोधात शिवसेनेने प्रदीप शर्मांना उमेदवारी देऊन त्यांना तगादा विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा वचपा बविआ राज्यसभेच्या निवडणुकीत काढतील, अशी शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.