मोबाइलवर तुम्हाला काहीही पाहायचे असेल तर तुम्हाला इंटरनेट आवश्यक आहे. इंटरनेटची जोडणी नसेल तर mobile मधील कोणतेही अॅप वा फीचर निरर्थकच. मात्र, आता एका नव्या तंत्रज्ञानामुळे Internet शिवाय मोबाईलवर Video, Cricket, Cinema वा अन्य मल्टिमीडिया कंटेट पाहता येणार आहे. काय आहे हे तंत्रज्ञान.
Direct to Mobile (D To M)
- डायरेक्ट टू मोबाइल म्हणजे व्हिडीओ आणि अन्य मल्टिमीडिया कंटेंट थेट तुमच्या मोबाईलवर प्रक्षेपित करणे तेही इंटरनेटविना.
- या तंत्रज्ञानामुळे ओटीटी प्लॅटफाॅर्मही मोबाइलवर उपलब्ध होऊ शकतील.
- ब्राॅडबॅण्ड आणि ब्राॅडकास्ट हे दोन्ही तंत्र मिळून डीटूएम तंत्रज्ञानाची निर्मीती केली जाणार आहे.
- त्यासाठी दूरसंचार खाते आणि प्रसार भराती हे या तंत्रज्ञानावप काम करत असून त्यासाठी कानपूर आयआयटीची मदत घेतली जात आहे.
( हेही वाचा: Repo Rate म्हणजे काय? RBI च्या पतधोरणानंतर कसे स्वस्त आणि महाग होतात कर्जे? जाणून घ्या )
तंत्रज्ञानाचे फायदे काय
- डीटूएम तंत्रज्ञानामुळे इंटरनेटविना थेट मोबाइलवर लाइव्ह न्यूज, स्पोर्टस आणि ओटीटी कंटेंट प्रसारित केला जाऊ शकेल.
- इंटरनेट डेटा नसल्याने कोणत्याही बफरशिवाय हे सर्व मोबाइलवर पाहता येईल.
- जनतेशी संबंधित कोणतीही विशेष माहिती थेट मोबाइलवर प्रसारित केली जाऊ शकेल. त्यामुळे फेक न्यूज रोखणे, इमर्जन्सी अलर्ट जारी करणे आणि आपत्ती व्यवस्थापन इत्यादींमध्ये तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल.