केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) पदावरील नियुक्तीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. सीडीएस पदासाठी पात्र अधिकाऱ्यांची व्याप्ती वाढवत संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
( हेही वाचा : ट्रायडेंटमध्ये ‘मविआ’चे शक्तिप्रदर्शन, १२ अपक्ष आमदार उपस्थितीत राहिल्याचा दावा)
या नव्या निकषानुसार नौदल आणि हवाई दलात सेवा करणारे लेफ्टनंट जनरल किंवा त्यांच्या समकक्ष देखील सीडीएस (CDS) बनू शकतात. मार्गदर्शक तत्त्वे तिन्ही सेवांमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सक्रिय रँकच्या अधिकाऱ्यांना लष्करप्रमुख, हवाई दल प्रमुख आणि नौदल प्रमुख यासारख्या वरिष्ठांचे सुपरसीडिंग करून सीडीएस होण्याचा मार्ग मोकळा करतात. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वयाच्या 62 वर्षांपेक्षा कमी वय असलेले कोणतेही सेवानिवृत्त किंवा निवृत्त लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल आणि व्हाईस ऍडमिरल दर्जाचे अधिकारी सीडीएस पदासाठी पात्र असतील. सुधारित नियमांनुसार सैन्य , नौदल आणि भारतीय हवाई दलाच्या सेवा प्रमुखांसह उच्च पदस्त अधिकाऱ्यांचा सीडीएस पदासाठी विचार केला जाऊ शकतो.
गेल्या वर्षी 8 डिसेंबर 2021 रोजी हेलिकॉप्टर अपघातात जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झाल्यापासून संरक्षण दलाचे प्रमुख हे पद रिक्त आहे.पुढील सीडीएस निवडण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असणे हा महत्त्वाचा निकष आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुढील सीडीएसच्या नियुक्तीपूर्वी सुमारे 30 सेवारत आणि निवृत्त अधिकाऱ्यांच्या आरोग्य नोंदी तपासत आहे. सरकारला लवकरात लवकर नवीन सीडीएसची निवड करायची आहे जेणेकरून सैन्याच्या आधुनिकीकरणाची आणि थिएटर कमांडच्या निर्मितीची प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकेल.
तिन्ही सैन्यप्रमुखांची संयुक्त पत्रपरिषद
लष्करातील भरतीबाबत नवीन नियम जाहीर होऊ शकतात. त्यासाठी तिन्ही लष्करप्रमुख बुधवारी ८ जून रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. तिन्ही लष्करप्रमुख चीफ ऑफ टूर ऑफ ड्युटीसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community