महाराष्ट्र सदनात रविवारी सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडणार!

104

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख करून देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे रविवारी १२ जून २०२२ रोजी येथील महाराष्ट्र सदनात आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सदनात रविवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान या सांस्कृतिक कार्यक्रमाकडून आयोजन करण्यात आले आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून महाराष्ट्र आणि ओडिशा राज्यांमध्ये सांस्कृतिक आदान- प्रदानासाठी करार झाला आहे. या पार्श्वभूमीवर उभय राज्यांतील सांस्कृतिक आदान-प्रदानाच्या उद्देशाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : रविवारी पाच तासांचा मेगाब्लॉक, हार्बर रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन)

महाराष्ट्र आणि ओडिशाच्या लोककलांचे घडणार दर्शन

ओडिशातील ‘प्रतिवा समूह’ आणि महाराष्ट्राकडून सांगली येथील ‘शाहीर शुभम विभूते आणि पार्टी’ नियोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून उभय राज्यांतील समृध्द लोककलांचे सादरीकरण केले जाणार आहे. ओडिशातील समृध्द आदिवासी परंपरा, विविध विधीकार्य प्रसंगी तसेच सण-समारंभावेळी सादर होणाऱ्या लोककलांचे दर्शन या कार्यक्रमात घडणार आहे. तसेच,महाराष्ट्राला समृध्द करणारी ग्रामीण, आध्यात्मिक परंपरा दर्शविणाऱ्या लोकलांचे सादरीकरण या कार्यक्रमात केले जाईल.

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील मराठी व उडिया समुदायासह अन्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून उभय राज्यांचा समृध्द सांस्कृतिक वारसा अनुभवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.