राज्यसभा निवडणुकीच्या एका उमेदवाराच्या पराभवानंतर राऊतांनी गद्दारी करणाऱ्या आमदारांना फटकारले. दरम्यान शिवसेनेला मत न टाकलेल्या आमदारांची नावे राऊतांनी जाहीर केले आहेत. त्यानंतर संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी रविवारी केला. या पार्श्वभूमीवर राऊतांवर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. यासह किरीट सोमय्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली.
दिल्लीतील नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींबाबत सोमय्या तक्रार करणार आहेत. सोमय्यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींवरुन भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा – …हा गोपनीयतेचा भंग नाही का? सोमय्यांचा निवडणूक आयोगाला सवाल)
काय केले ट्विट
संजय राऊतांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिल्ली दौऱ्यावर जात आहे, असे सोमय्यांनी सांगितले. यावेळी निवडणूक आयोगाकडे संजय राऊत यांची निवड बाद करण्याची मागणी करणार आहे. “संजय राऊत यांनी अर्धा डझन आमदारांची नावे उघड केली आणि त्यांनी आपला विश्वासघात केल्याचे सांगितले आणि त्यांना दिलेल्या आश्वासनानुसार मते दिली नाहीत असे संजय राऊत म्हणाले असल्याचे किरीट सोमय्यांनी ट्विट करत सांगितले आहे.
I am going to Delhi today to
Request Election Commission to inquire threatening MLA's & corrupt practices by Sanjay Raut & cancel his election
"Sanjay Raut disclosed names of half dozen mla’s & stated they have betrayed him & has not given votes as promised to him, shivsena"
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 13, 2022
वेळेवर गेम पाटल्याने आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीमुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला. हार शिवसेनेच्या जिव्हारी लागली असून विश्वासातील अपक्ष आमदारांनीच भाजपला मतदान केल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या आमदारांची नावे सांगितली.
Join Our WhatsApp Community