कार मॉडिफाय केली असेल, तर वाचा RTO चे नियम… अन्यथा भरावा लागेल दंड

100

भारतात वाहनांमध्ये आपल्या आवडीनुसार बदल करण्याची मोठी क्रेझ आहे. मात्र मॉडिफाय केलेल्या कारमुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता असते. कार मॉडिफाय ( car modified ) करण्याआधी तुम्हाला एकदा आरटीओ (RTO) चे नियम पहावे लागतील अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. गुन्ह्यांना आळा बसावा, वाहनांचा बेकायदेशीर वापर होऊ नये तसेच वाहनांमधून कोणत्याही प्रकारची तस्करी होऊ नये यासाठी हे नियम बनवण्यात आले आहेत.

RTO चे नियम

मे २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कारमध्ये टिंटेड ग्लास, ब्लॅक फिल्म्स काचेच्या वापरावर नियंत्रण आणणारा निर्णय दिला. त्यानंतर RTO ने आपल्या नियमांमध्ये सुधारणा केली. कारची खिडकी बंद असताना कोणतीही व्यक्ती बाहेरून आत पाहू शकणार नाही, मात्र आत बसलेली व्यक्ती बाहेरच्या सर्व गोष्टी पाहू शकतात. यासाठी काही जण टिंटेड ग्लास किंवा काचेवर ब्लॅक फिल्म लावतात यामुळे कारच्या बाहेरून तुम्हाला आतमधील काहीच दिसणार नाही.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या अक्षय चैतन्य आहारावर कामगार नाराज; उपहारगृहातील व्हिडिओ व्हायरल)

तुम्हाला माहिती आहे का अशाप्रकारे कार मॉडिफाय करणे किंवा त्यामध्ये फेरफार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. परिवहन विभागाने कारमध्ये टिंटेड ग्लास वापरण्यास सक्त मनाई केली आहे. असे केल्यास तुम्हाला चलन भरावे लागू शकते. तसेच कायद्यात शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.