महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) गृहनिर्माण योजनांसाठी तसेच सदनिकांच्या वितरणासाठी विविध गटांसाठी उत्पन्नाची मर्यादा आणि घरासांठीचे क्षेत्रफळ सुधारित करण्याचा निर्णय मागील महिन्यात घेतला. उत्पनाच्या मर्यादेनुसार म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता येत होता. मात्र आता या निर्णयामधील त्रुटी दूर करून सुधारित निर्णय जारी करण्यात आला आहे.त्यानुसार उच्च उत्पन्न गटासाठी असलेली उत्पन्नाची मर्यादा हटविण्यात आली आहे.
उत्पन्न मर्यादा हटवली
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनाने अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गट या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या चटई क्षेत्रफळाच्या धर्तीवर म्हाडाच्या घरांसाठी क्षेत्रफळ निश्चित करण्यात आले आहे. आता उत्पन्न मर्यादेनुसारच सदनिकांचे वाटप केले जाणार आहे. उत्पन्नसाठी गट निश्चित करताना शासनाने शहरांची विभागणी दोन प्रवर्गात केली आहे.
यामध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पीएमआरडीए क्षेत्र, नवी मुंबई महानगर आदी प्राधिकरणे तसेच १० लाखांपेक्षा जास्त असलेली शहरे यासाठी उत्पन्नाची मर्यादा वेगळी केली आहे. २०२०-२१ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गृहनिर्माण विभागाने उत्पन्नाची मर्यादा घरांसाठीचे चटई क्षेत्रफळ यामध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार उत्पन्नाच्या मर्यादेत नागरिकांना घरासाठी अर्ज करण्याची अट होती ही अट आता शिथिल करण्यात आली आहे.
- अत्यल्प उत्पन्न गट – ६ लाखांपर्यंत ३० चौ.मी.
- अल्प उत्पन्न गट – ९ लाखांपर्यंत ६० चौ.मी.
- मध्यम उत्पन्न गट – १२ लाखांपर्यंत १६० चौ.मी.
- उच्च उत्पन्न गट – कमाला मर्यादा नाही २०० चौ.मी.