राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांचा नकार, तरी उमेदवार देणारच – ममता बॅनर्जी

95
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये पार पडली. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एक समान उमेदवार उभा करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे. तरीही विरोधी पक्षनेते या निवडणुकीत उमेदवार देणार आहेत, असे बॅनर्जी म्हणाले. या उमेदवाराला बैठकीतील सर्व पक्षांचा पाठिंबा असणार आहे. भाजपविरोधी पक्ष अनेक महिन्यांनी एकत्र बसले आहेत, पुन्हा एकत्र बसणार आहोत, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यात २२ विरोधी नेत्यांना आणि बिगर-भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १५ जूनच्या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली होती.

कोणते पक्ष बैठकीला अनुपस्थित?

याप्रसंगी सुधींद्र कुलकर्णी म्हणाले की, आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक समान उमेदवार उभा करण्याचा निर्णय विरोधी पक्षनेत्यांनी घेतला आहे. तो उमेदवार रबर स्टॅम्प म्हणून काम न करता संविधानाचा संरक्षक म्हणून काम करेल आणि मोदी सरकारला भारतीय लोकशाहीचे नुकसान करण्यापासून रोखू शकेल. त्याचवेळी आजच्या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस नेत्यांसह डावे पक्षही सहभागी झाले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील या बैठकीत अनेक पक्ष सहभागी झाले नाहीत. या बैठकीत सर्वात प्रमुख म्हणजे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), ज्याचे नेतृत्व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करतात. यासोबतच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्ष सहभागी नव्हते.

शरद पवार यांचा नकार 

आजच्या बैठकीपूर्वी बॅनर्जी यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पवार यांच्या पक्षाने ते राष्ट्रपती भवनाच्या शर्यतीत असण्याची शक्यता खोडून काढली आणि काही विरोधी पक्षांनी संयुक्त विरोधी उमेदवार म्हणून त्यांच्या नावाला पाठिंबा दिला असतानाही ते निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष स्वत:ला राष्ट्रपती भवनापुरते मर्यादित ठेवू इच्छित नाहीत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात ते व्यस्त आहेत, असे एनसीपीच्या एका नेत्याने सांगितले.

१८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक

देशातील सर्वोच्च घटनात्मक पदासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार असून २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीतून निवडणूक आलेले ४,८०९ खासदार आणि आमदार हे रामनाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी निवडणार आहेत.
हे पक्ष आणि नेत्यांची नावे 

 

  • काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे, रणदीप सुरजेवाला आणि जयराम रमेश
  • TMC कडून स्वत: पक्षाध्यक्षा ममता बनर्जी
  • आरजेडीकडून खासदार मनोज झा
  • सीपीएमकडून ई करीम
  • सीपीआईहून बिनॉय विश्वम
  • JDS कडून HD देवेगौडा आणि कुमारस्वामी
  • डीएमकेकडून T R Balu
  • शिवसेनाकडून खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि सुभाष देसाई
  • समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव
  • PDP कडून महबूबा मुफ्ती
  • IUMLकडून ई टी मोहम्मद बशीर
  • राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार
  • RSPकडून N K प्रेमचंद्रन
  • RLD कडून जयंत चौधरी
  • सीपीआईएमएलकडून दीपांकर भट्टाचार्य
  • नॅशनल कांफ्रेंसकडून उमर अब्दुल्ला आईटी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.