कुर्ल्यात बदललेले आरक्षण कुठल्या नगरसेवकाच्या आणि पक्षाच्या पथ्यावर पडणार?

111

मुंबईतील सर्वांत जास्त नगरसेवकांची संख्या असलेला महापालिकेचा प्रशासकीय विभाग म्हणून एल विभाग मोडला जातो. कुर्ला, चांदिवली, साकीनाका आदींचा समावेश असलेल्या या एल विभागात यंदाच्या निवडणुकीत आणखी एका अतिरिक्त प्रभागाची भर पडली आहे. या कुर्ला एल विभागात जिथे १६ प्रभाग होते, तिथे आता १७ प्रभाग गणले जाणार आहेत.

मागील २०१७च्या निवडणुकीत या कुर्ला एल विभागात शिवसेनेचे ०५, मनसेचे ०३,भाजपचे ०२, काँग्रेसचे ०३, राष्ट्रवादी काँग्रेसचे ०२ आणि अपक्ष एक अशाप्रकारे नगरसेवक निवडून आले होते. त्यातील मनसेच्या तीन नगरसेवकांपैकी  दिलीप लांडे व अश्विनी माटेकर यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. तर अपक्ष नगरसेवक किरण लांडगे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे या विभागात १६ पैकी ०८ नगरसेवक हे एकट्या शिवसेनेचे आहेत. या विभागात आजवर कुणाच्या एका पक्षाचे वर्चस्व राहिलेले नसून, सर्व पक्षांचे नगरसेवक तुल्यबळ संख्येत निवडून येत असतात.

मनसेच्या नगरसेवकांचा प्रभाग महिला आरक्षित 

या विभागातील मनसेचे नगरसेवक असलेले दिलीप लांडे हे आमदार झाले असून, त्यांचा प्रभाग महिला आरक्षित झाला आहे. त्यामुळे ते पुन्हा बायकोला निवडणूक रिंगणात उतरवतात की सुनेला पुढे आणतात असा प्रश्न आहे. तर अश्विनी माटेकर यांचा प्रभाग खुला झाल्याने, अशोक माटेकर यांच्यासाठी महापालिकेचे दरवाजे खुले झाले आहेत. राष्ट्रवादीच्या डॉक्टर सईदा खान आणि कप्तान मलिक या दोन्ही नगरसेवकांचे प्रभाग खुले झाले आहेत. त्यामुळे ते टेन्शन फ्री आहेत.

या प्रभागात भाजपचे दोन नगरसेवक 

भाजपचे या प्रभागात दोन नगरसेवक आहेत. यातील हरिष भांदिर्गे यांच्या एका प्रभागाचे दोन तुकडे आहेत. परंतु एका प्रभागाचे दोन प्रभाग झाल्यानंतरही आरक्षणाने त्यांचा घात केला आहे. दोन्ही प्रभागात त्यांना स्वत:ला निवडणूक लढवता येणार नाही. कारण दोन्ही प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत. त्यातल्या त्यात नव्याने निर्माण झालेला प्रभाग क्रमांक १७० मधून ते आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात. तर प्रकाश मोरे यांचा प्रभाग खुला झाला असला तरी त्यांचा जनसंपर्क कमी असल्याने पक्ष नाराज आहे. त्यातच महापालिका सदस्य रद्द करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी १५ दिवस आधी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या कोमल जामसंडेकर यांना नगरसेवक म्हणून जाहीर करण्यात आले होते.

या विभागात पक्षाशी प्रामाणिक असलेल्या मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांचा प्रभागही आता महिला आरक्षित झाला आहे. त्यामुळे तुर्डे आता बाजुला सरकतात की घरातील कुणा महिलेला निवडणूक रिंगणात उतरवतात याकडे लक्ष आहे. शिवसेनेच्या चित्रा सांगळे, प्रविण मोरजकर, सान्वी तांडेल यांचे प्रभाग महिला आरक्षित बनल्याने अडथळ्याचा एक पल्ला गाठण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. तर शिवसेनेच्या आकांक्षा शेट्ये यांचा प्रभाग अनुसूचित जातीकरता आरक्षित झाल्याने त्यांनाही नवीन प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

आमदार पुत्राची दावेदारी प्रबळ

काँग्रेसचे अश्रफ आझमी आणि त्यांच्या पत्नी दिलशान आझमी या दोन्ही नगरसेवकांचे प्रभाग अनुक्रमे महिला व खुला प्रवर्ग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे दोन्ही नगरसेवकांमध्ये प्रभागांची अदलाबदली होऊ शकते. तर काँग्रेसचे दुसरे नगरसेवक वाजीद कुरेशी यांचाही प्रभाग खुला झाल्याने, शिवसेनेकडून पुन्हा एकदा आमदार पुत्राची प्रबळ दावेदारी या प्रभागावर सांगितली जाणार आहे.

विशेष म्हणजे अपक्ष म्हणून निवडून आलेल्या किरण लांडगे यांचा प्रभाग अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरता आरक्षित झाल्याने त्यांची कोंडीच झाली आहे. त्यामुळे लांडगे यांना स्वत:साठी नसला तरी पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करावी लागेल. त्यामुळे पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास ते पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात याकडेही लक्ष राहणार आहे.

( हेही वाचा: SSC Result 2022: १७ जूनला दहावीचा निकाल होणार जाहीर )

असे आहे विद्यमान प्रभाग, नवीन प्रभाग रचना आणि त्यांचे आरक्षण

१५६, महिला(अश्विनी माटेकर, शिवसेना,) नवीन प्रभाग: १६१, आरक्षण : खुला प्रवर्ग
प्रभाग रचना:  शंकरनगर, राजे संभाजीनगर, बामन दया पाडा,  बासू कमल सोसायटी, मुरजान वाडी

१५७,  ओबीसी महिला(आकांक्षा शेट्ये, शिवसेना,) नवीन प्रभाग: १६२, आरक्षण : अनुसूचित जाती महिला

प्रभाग रचना: रामबाग, रहेजा बिहार, चांदिवली, रिजेन्सी पार्क, साकिनाका, संघर्ष नगर, न्यू म्हाडा कॉलनी

१५८,ओबीसी महिला(चित्रा सांगळे, शिवसेना,) नवीन प्रभाग: १६३, आरक्षण : महिला आरक्षित

प्रभाग रचना: नायरवाडी, यादवनगर, म्हाडा कॉलनी, श्रीनगर, गणेशनगर

१५९, खुला प्रवर्ग (प्रकाश मोरे, भाजप) नवीन प्रभाग: १६४, आरक्षण : खुला प्रवर्ग

प्रभाग रचना: असल्फा, जी. एस. कॉलनी, लाडूर गोम्स कम्पोउंड, परेरावाडी या प्रमुख ठिकाणे

१६०,खुला प्रवर्ग (किरण लांडगे, शिवसेना,) नवीन प्रभाग: १६५, आरक्षण : अनुसूचित जाती महिला

प्रभाग रचना: गोविंदनगर यादवनगर, भिम नगर,आझादनगर, मिलींदनगर

१६१, ओबीसी (विजय शिंदे, शिवसेना,) नवीन प्रभाग: १६६, आरक्षण : खुला प्रवर्ग

प्रभाग रचना: टिळक नगर, सावरकर नगर ,शेठीया नगर,अशोक नगर, मिलिंद नगर,

१६२,ओबीसी (वाजीद कुरेशी, काँग्रेस) नवीन प्रभाग: १६७, आरक्षण : खुला प्रवर्ग
प्रभाग रचना: शिवाजीनगर, साथी डिसोझा नगर, स्पेनटा  रेसिडन्सी पार्क, एअरपोर्ट रन वे

१६३, ओबीसी ( दिलीप लांडे, शिवसेना,) नवीन प्रभाग: १६८, आरक्षण :महिला प्रवर्ग
प्रभाग रचना: इंदिरानगर , काजूपाडा, स्टार गल्ली, स जरीमरी कुर्ला, प्रभातनगर

१६४, खुला(हरिष भांदिर्गे, भाजप,) नवीन प्रभाग: १६९, आरक्षण : महिला आरक्षित
प्रभाग रचना: पटेलवाडी, गायबन शहानगर, संजयनगर, अंबिकानगर, अशोकनगर, भिमनगर

१६४, खुला(हरिष भांदिर्गे, भाजप,) नवीन प्रभाग: १७०, आरक्षण : महिला आरक्षित

प्रभाग रचना: नवपाडा विद्याविहार सोसायटी, किरोल व्हिलेज, प्रिमियर कॉलनी

१६५, खुला(अश्रफ आझमी, काँग्रेस,) नवीन प्रभाग: १७१, आरक्षण : महिला आरक्षित
प्रभाग रचना: क्रांतीनगर, संदेशनगर, बैल बाजार, स्मितनगर, सिताराम भैरू रोड, अंधेरी कुर्ला रोड, लालबहादूर शास्त्री मार्ग

१६६, खुला(संजय तुर्डे, मनसे) नवीन प्रभाग: १७२, आरक्षण : महिला आरक्षित
प्रभाग रचना: जय अंबिका नगर, फ्रेंड्स कॉलनी, किरोल रोड, ख्रिशचन कॉलनी,सोनापूर लेन, कोहिनुर सिटी रोड

१६७,महिला (दिलशान आझमी, काँग्रेस) नवीन प्रभाग: १७३, आरक्षण :खुला प्रवर्ग 
प्रभाग रचना: आंबेडकर नगर, नेताजीनगर, बुद्ध कॉलनी, टिचर कॉलनी, विनोबा भावे नगर

१६८, महिला(डॉ सईदा खान,राष्ट्रवादी काँग्रेस) नवीन प्रभाग: १७४, आरक्षण : खुला प्रवर्ग

प्रभाग रचना: कपाडीया नगर, छाडवा नगर, बिकेसी कुर्ला, महाराष्ट्र नगर ,नायकनगर

१६९,अनुसूचित जाती महिला(प्रविणा मोरजकर, शिवसेना) नवीन प्रभाग: १७५, आरक्षण : महिला आरक्षित
प्रभाग रचना: नेहरू नगर, जागृती नगर, शिवशक्ती नगर, साबळे नगर

१७०, खुला(कप्तान मलिक,राष्ट्रवादी काँग्रेस) नवीन प्रभाग: १७६, आरक्षण :खुला प्रवर्ग

प्रभाग रचना:कुरेशीनगर, तक्षशिला नगर, राहुल नगर, जी. टी. बी. नगर, एव्हरार्ड नगर, मराठी विज्ञान परिषद

१७१,ओबीसी महिला(सान्वी तांडेल, शिवसेना) नवीन प्रभाग: १७७, आरक्षण : महिला आरक्षित
प्रभाग रचना: म्हाडा कॉलनी, प्रेमनगर, ताडवाडी समर्थनगर, चूनाभट्टी म्युनिसिपल हॉस्पीटल

 

  • सन २००१७च्या निवडणुकीतील आरक्षण : महिला :०३, खुला प्रवर्ग : ०६, ओबीसी ३ महिला, ३ पुरुष, अनुसूचित जाती महिला :०१ (एकूण १६ नगरसेवक)
  • सन २०२२च्या निवडणुकीतील आरक्षण : महिला :०८, खुला प्रवर्ग : ०७, अनुसूचित जाती महिला :०१, खुला :०१ (एकूण १७ नगरसेवक)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.