मनसे नेते वसंत मोरे ‘त्या’ महिलेसाठी बनले ‘दीर’

92

पीएमपीएमएल बसगाडीत रात्री एका महिला तिच्या लहान मुलासह बसून होती, तिचा दीर तिला घेण्यासाठी येणार होता, त्याची ती प्रतीक्षा करत होती, मात्र त्यासाठी  पीएमपीएमएलचे चालक आणि वाहक मात्र ताटकळत बसले होते. अखेर मनसे नेते वसंत मोरे हे या महिलेच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी तिला तिच्या घरी सुखरूप सोडवले.

…आणि वसंत मोरे बस जवळ आले

मनसेचे सरचिटणीस वसंत मोरे हे नेहमीच आपल्या अनेक चांगल्या गोष्टींनी चर्चेत असतात. बुधवारी, १५ जुलै रोजी रात्री ते नेहमीप्रमाणे भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्या ठिकाणी एक पीएमपीएमएल बस पूर्ण लाईट लावून उभी होती. गाडीचा कंडक्टर गाडीच्या भोवती फिरत होता आणि ड्रायव्हर सीटवरच बसून होता. हा सर्व प्रकार वसंत मोरे काही वेळ पहात होते. त्यानंतर त्यांना थोडी शंका आली. त्यांनी जवळ जाऊन त्या गाडीच्या कंडक्टरची विचारपूस केली, त्यावर त्या कंडक्टरने आम्ही आताच सासवडहून ट्रिप करून आलो आहोत. गाडीमध्ये एक महिला आणि तिचे छोटेसे बाळा आहे. ताई इकडे बाजूला राहतात, त्यांना कात्रज परिसरातील राजस सोसायटीजवळ आल्यावर त्यांचा दीर त्यांना न्यायला येईल म्हणून पण 15 मिनिटे झाली, तरी कोणी आले नाही. त्यामुळे आम्हाला धड गाडीही सोडता येईना आणि घरीही जाता येईना.

bus

(हेही वाचा सर्वेक्षणात त्रुटी तरी इम्पेरिकल डेटासाठी सर्वेक्षण थांबवणार नाही! छगन भुजबळ यांची माहिती)

काय म्हणाले वसंत मोरे?

हा सर्व प्रकार वसंत मोरे यांच्या लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेला आणि मुलाला स्वतःच्या गाडीत बसवले आणि त्यांना सुखरूप घरी सोडले. मात्र खरे कौतुक करावे त्या पीएमपीएमएलच्या कंडक्टर आणि ड्राइव्हरचे. या दोघांचे नाव नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर अशी आहेत. कारण आजच्या दुनियेत एकटी महिला दिसली की लोकांच्या नजरा बदलतात. मात्र या बसच्या  कंडक्टर आणि ड्रायव्हरने जे भावासारखे वर्तन केले. त्यामुळे माणुसकी अजूनही शिल्लक आहे. घरच्यांनी देखील एकटी महिला आणि कुणी त्यांच्यासोबत लहान मूल असेल तर त्यांना एकटे पाठवू नका, एवढे निष्काळजी होऊ नका, असे आवाहन वसंत मोरे यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.