ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील तळवली (बारागाव) येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समिती द्वारा संचलित महाराष्ट्र मिलिटरी स्कूल चालविण्यात येत आहे. या निवासी सैनिकी शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावीचा) मार्च २०२२ मधील निकाल शतप्रतिशत (१०० टक्के) लागला आहे. गेल्या १५ वर्षांमधील उज्वल यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.
( हेही वाचा : श्रीमद्भगवद्गीताला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता द्या! हिंदु राष्ट्र संसदेत ठराव)
शालांत परीक्षेमध्ये १०० टक्के सुयश
शाळेतील १०० टक्के विद्यार्थी विविध खेळांमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व करतात. तेथेही त्यांची उत्तम कामगिरी आहे. विद्यालयाचे प्राचार्य काशिनाथ भोईर तसेच संस्थेचे कार्यवाह, रणजित सावरकर यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू असून पाचवी ते दहावी इयत्तेतील प्रवेशासाठी मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. तरी इच्छुकांना प्रवेश घेता येईल, अशी माहितीही प्राचार्य भोईर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ९२७०५०७५९७, ९२७३११५८३८, ८८८८१९५५७४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community