पंतप्रधान नरेंद्र मोदींना मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित असल्याने, राज्यभर याची चर्चा होती. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्र्यांचे नाव नसल्याने उद्धव ठाकरे गैरहजर राहिल्याचे सांगितले जात आहे. मंगशेकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ट्वीट करत केली नाराजी व्यक्त
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता मंगेशकर पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील ष्णमुखानंद हाॅलमध्ये प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर होते, पण कार्यक्रमाच्या पत्रिकेवर सुद्धा मुख्यमंत्र्यांचा उल्लेख टाळण्यात आला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली.
( हेही वाचा: महागाईचे चटके! तब्बल 143 जीवनावश्यक वस्तूंच्या दरांत होणार वाढ, जाणून घ्या तपशील )
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.#निषेद pic.twitter.com/xVarHhGfou
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 24, 2022
पंतप्रधानांचे भावूक उद्गार
संगीत विषयाचा मी विशेष ज्ञानी नाही. संगीत एक साधना आणि भावना आहे. संगीत तुम्हाला वैराग्याची अनुभूती देते, तुमच्यात वीररस निर्माण करते, राष्ट्रभक्ती निर्माण करते, संगीताच्या या सर्व छटा आपल्याला लता मंगेशकर यांच्या माध्यमातून अनुभवा येतात. माझ्यासाठी लतादीदी सूरसम्राज्ञीसह माझ्यासाठी मोठी बहीण होती. मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांच्याकडून मला अपार प्रेम मिळाले. अनेक वर्षानंतर राखी पौर्णिमा येईल तेव्हा दीदी नसणार आहे, असे भावुक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
Join Our WhatsApp Community