गणपतीपुळ्यात पहिल्यांदा आढळली ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले

88

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणा-या आणि नेहमीच पर्यटकांनी गजबजलेल्या गणपतीपुळे किनार्यावर ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले आढळली आहेत. या जिल्ह्यात इतर ठिकाणी आतापर्यंत कासवाची पिल्ले आढळली होती. गणपतीपुळे येथे प्रथमच ती आढळली असल्याचे सांगितले जात आहे. कासव संवर्धनासाठी वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत प्रचार, प्रबोधन सुरू आहे.

पिल्लांना समुद्रापर्यंत रांगत जाणे अशक्य

समुद्र किनारी गावांमध्ये कासवमित्र तयार होत आहेत. जिल्ह्यात सर्वप्रथम वेळास (मंडणगड) येथे कासवाची पिल्ले आढळली. त्यानंतर राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील किनाऱ्यांवरही ऑलिव्ह रिडले कासवांनी अंडी घातली आहेत. रत्नागिरी तालुक्यात गावखडी किनार्यांवर प्रदीप डिंगणकर कासवांच्या घरट्यांचे रक्षण करत आहेत. शांत परिसर असलेल्या किना-यावर बहुतांश वेळी कासवे अंडी घालण्यासाठी दाखल होतात. पण गणपतीपुळे येथील गजबजलेल्या किना-यावर एक कासव अंडी घालून गेले होते. रविवारी (दि. २४ एप्रिल) किनार्यावरील प्रभाकर गावकर यांच्या स्टॉलच्या बाजूला कासवांची काही पिल्ले रांगत असल्याचे लक्षात आले. ती पिल्ले रांगत समुद्रापर्यंत जाणे अशक्य होते. किनार्यावर उंट, घोडे यांची रपेट कायमच सुरू असते.

(हेही वाचा – शरद पवार म्हणाले, “… त्याकरिता इतकं अस्वस्थ व्हायची गरज नाही”)

जीवरक्षकांच्या पुढाकाराने १७ पिल्ले समुद्रात रवाना

पर्यटकांना फिरवण्यासाठीच्या गाड्या आणि पर्यटकांचा राबता लक्षात घेता ती पिल्ले समुद्रात जाणे अशक्य होते. त्यामुळे किना-यावरील जीवरक्षक आणि स्टॉलधारकांनी पुढाकार घेऊन १७ पिल्ले समुद्रात सोडली. त्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.