सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आता ताबा कोण घेणार?

101

एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सदावर्ते यांना कोल्हापूर पोलीस मुंबईतील ऑर्थर कारागृहाकडे घेऊन रवाना झाले. मात्र आता पुणे पोलिसांना सदावर्ते यांचा ताबा हवा आहे, त्याकरता त्यांनी अर्ज केला आहे.

कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलकडे रवाना 

कोल्हापुरात सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी पुणे पोलीस कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले होते. 2020 मध्ये सदावर्ते यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांचा ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांनी अर्ज देखील केला आहे. मात्र कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर जेलकडे रवाना झाले आहेत.

(हेही वाचा ‘मातोश्री’ कसे बनले शिवसैनिकांसाठी मंदिर?)

सदावर्तेंना कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल

कोल्हापूर पोलिसांनी सदावर्तेंना आर्थर जेलमध्ये दाखल केल्यानंतर पुणे पोलिसांना सदावर्तेंचा ताबा मिळू शकतो. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने वक्तव्य केल्यामुळे सदावर्तेंवर कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलीस ठाण्यात 15 एप्रिल रोजी कलम 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. 20 तारखेला सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळाल्यानंतर  21 तारखेला न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.