धुळ्यात ९० तलवारी जप्त, “हा योगायोग की ठरवून केलेले षडयंत्र?”; राम कदमांचा खळबळजनक आरोप

चारचाकीतून ९० तलवारी जप्त, ४ जण ताब्यात

84

महाराष्ट्रातील धुळे येथे बुधवारी पोलिसांनी मोठा शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. यामध्ये तब्बल ९० तलवारी आढळून आल्या आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठी दंगल घडवण्याचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. यासोबतच या भाजप नेत्याने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती मिळतेय.

(हेही वाचा – ‘मविआ’ची ३० एप्रिलला जाहीर सभा, विरोधकांना ‘करारा जवाब मिलेगा’?)

हे प्रकरण समोर आल्यानंतर भाजप नेत्याने प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान कोण रचतंय? तसेच धुळे आणि यापूर्वी देखील औरंगाबादमध्ये तलवारी सापडल्या असल्याने या तलवारी काँग्रेसशासित राजस्थानमधून आयात केल्या गेल्या होत्या. यावरून राम कदमांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. या कटात काँग्रेसचा हात आहे का? यासोबतच उद्धव ठाकरे सरकारला या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करणार का असा सवाल देखील उपस्थित केला आहे.

 हा योगायोग की ठरवून केलेले षडयंत्र आहे?

धुळ्यात बुधवारी ९० तलवारी सापडल्याने काही गंभीर सवाल राम कदम यांनी उपस्थित केले आहेत. तसेच यासह ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान कोण रचतंय? असा प्रश्न विचारत ते म्हणाले, धुळ्यात ९० तलवारी जप्त करण्यात आल्यात. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असून राजस्थानमधून त्या तलवारी जालन्यात पाठवल्या जात होत्या. त्यामुळे जालन्यात या ९० तलवारींचे काय काम? कोणाला या तलवारी हव्या होत्या? कोणाला मारण्यासाठी त्या मागविल्या जात होत्या? एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र कोण पाठतंय? ज्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आहे, त्या ठिकाणाहून पाठवले जात आहे? हा योगायोग आहे की ठरवून केलेले षडयंत्र आहे? असे एक न् अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहे.

कदमांनी उपस्थित केले सवाल

  • महाराष्ट्रात कोणाला दंगल घडवायची आहे?
  • या कटात काँग्रेसचा हात आहे का?
  • ठाकरे सरकार त्याच्या मुळाशी जाऊन चौकशी करणार का?

ठाकरे सरकार चौकशी करणार का?

औरंगाबाद आणि जालन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र कोण पुरवतंय? या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ठाकरे सरकार चौकशी करणार का? महाराष्ट्राच्या भूमीत हे शस्त्र कसे येतात? या प्रकरणाचे काँग्रेसचे नेते देखील उत्तर देणार का, असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.