जम्मू-काश्मिरमध्ये यावर्षी आतापर्यंत 62 दहशतवादी मारले गेले आहेत, त्यापैकी 47 स्थानिक दहशतवादी आणि 15 पाकिस्तानी दहशतवादी होते, अशी माहिती राज्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिली. यासंदर्भात आयजीपी विजय कुमार यांनी ट्वीट करत आकडेवारी जाहीर केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पोलीसांची मोठी कारवाई
जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी ट्विट करत सांगितले की, यावर्षी 1 जानेवारी 2022 पासून काश्मिरात एकूण 62 जिहादी दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये 47 स्थानिक आणि 15 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे. तसेच सुरक्षा दलांच्या कारवाईत मारले गेलेले सर्वाधिक 39 दहशतवादी हे लष्कर-ए-तैयबाचे होते. त्याखालोखाल जैश-ए-मोहम्मद 15, हिजबुल मुजाहिद्दीनचे 6, अलबद्रचे 2 असे एकूण 62 दहशतवादी ठार झाले आहेत.
( हेही वाचा: खाद्यपदार्थांना महागाईचा फटका; वडापाव, समोसा,इडली, डोसा आणि चहाच्या किमतीत वाढ )
पोलीस महानिरीक्षकांनी ट्विट करत दिली माहिती
पुलवामा जिल्ह्यात पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने मित्रगाम भागात शोध मोहिम हाती घेतली होती. यावेळी बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यात राज्यातील परप्रांतीयांवर हल्ले करणारे अल बद्रचे 2 दहशतवादी गुरुवारी पहाटे ठार झाले आहेत. त्यानंतर पोलीस महानिरीक्षकांनी ट्विट करत गेल्या 4 महिन्यांत 62 दहशतवादी ठार झाल्याची माहिती दिली.
Join Our WhatsApp Community