मे महिन्यात रमजान ईद, बुद्ध पौर्मिणा आणि भगवान श्री परशुराम जयंती आणि शनिवार, रविवारच्या सुट्टीमुळे बॅंका 11 दिवस बंद राहणार आहेत. यामुळे बॅंकेच्या सुट्ट्यांच्या तारखा पाहून बॅंकेच्या कामाचे नियोजन करा.
अशी आहे सुट्ट्यांची यादी
- १ मे – रविवार
- २ मे – रमजान-ईद (ईद-UI-फित्रा) (सोमवार): केरळमध्ये बँका बंद राहतील.
- ३ मे – भगवान श्री परशुराम जयंती/रमजान-ईद (ईद-UI-फित्रा)/बसव जयंती/अक्षय तृतीया (मंगळवार): केरळ वगळता देशभरात बँका बंद राहतील.
- ८ मे-रविवार
- ९ मे – रवींद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन (सोमवार): बंगालमध्ये बँका बंद राहतील.
- १४ आणि १५ मे – शनिवार आणि रविवार
- १६ मे- बुद्ध पौर्णिमा (सोमवार): त्रिपुरा, बेलापूर, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली येथे बँका बंद राहतील.
- २२ मे – रविवार
- २८ मे – शनिवार
- २९ मे – रविवार
बॅंकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर ते आताच करा. प्रत्यक्षात एप्रिल महिना संपत आला असून, मे महिना बॅंकांच्या सुट्ट्यांसह सुरु होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला सलग चार दिवस बॅंकांमध्ये कामकाज होणार नाही. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने मे 2022 साठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले आहे.
Join Our WhatsApp Community