मुंबईत मोठ्या प्रमाणात परदेशातून कुरिअर मार्फत अमली पदार्थांची तस्करी होत असून मुंबईच्या कस्टम विभागाने नुकत्याच केलेल्या एका कारवाईत अमेरिकेतून आलेला ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून इतर तस्कराचा शोध घेण्यात येत आहे.
अमली पदार्थची तस्करी करणाऱ्या एकाला अटक
मुंबईच्या कस्टम विभागाने शुक्रवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी कुरिअर मार्फत आलेले एक संशयित पार्सल ताब्यात घेतले होते. हे पार्सल तपासण्यात आले असता त्यात सुमारे २७ किलो मारीजुआना (उच्च प्रतीच्या गांजा) सापडला आहे. कस्टम विभागाने हे तपास सुरू करून अमली पदार्थची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे.
मारीजुआणा हा उच्च प्रतीच्या गांजा भारतात
तस्करी करणाऱ्याच्या मुंबईतील घरी छापे टाकून आणखी २० किलो मारीजुआणा हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा अमली पदार्थ अमेरिकेतून कुरिअर मार्फत पाठविण्यात आले होते, व हे पार्सलवर असलेल्या पत्यावरून तस्कराचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला मारीजुआणा हा उच्च प्रतीच्या गांजा असून त्याला भारतात तसेच परदेशात मोठी मागणी असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली आहे. या तस्करीमध्ये अनेक जण गुंतले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community