विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आपल्या हटके ट्वीटच्या माध्यमातून त्या सातत्याने राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करत असतात. त्यामुळे राजकारणात सक्रीय नसूनही राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा असते. आता सिने क्षेत्रातील मानाच्या अशा कान्स फेस्टिव्हलसाठी देखील त्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. सिनेक्षेत्रात कार्यरत नसूनही अमृता फडणवीस यांनी हा मान पटकावला आहे.
(हेही वाचाः इंटरनेट बंद करण्यात भारत जगात टॉपर, एका वर्षात इतक्या वेळा झाले इंटरनेट ब्लॉक)
मान पटकावणा-या पहिल्या महिला
साऊथ ऑफ फ्रान्स येथे होणा-या कान्स फेस्टिव्हलसाठी अमृता फडणवीस यांना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हे आमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 21 मे रोजी अमृता फडणवीस कान्स फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर झळकणार आहेत. सिनेक्षेत्रात कार्यरत नसूनही हा मान पटकावणा-या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
या विषयावर मांडणार विचार
कान्स फेस्टिव्हलमधील मास्टर माईंड फोरमवर 22 मे रोजी अमृता फडणवीस यांचे विशेष भाषण होणार आहे. आपल्या भाषणात शाश्वत ऊर्जेचा मानवी जीवनावर होणारा परिणाम या विषयावर त्या आपले विचार मांडणार आहेत. 23 मे राजी कान्स फेस्टिव्हलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यालाही अमृता फडणवीस उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’)
Join Our WhatsApp Community