शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी 1 मे ला औरंगाबाद येथे होणा-या राज ठाकरेंच्या सभेमध्ये जमणा-या गर्दीबाबत वक्तव्य केले आहे. सभेसाठी जमणारी लाखोंची गर्दी ही पैसे देऊन आणली जाणार असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. खैरे यांनी थेट पत्रकारांनाच आवाहन केले आहे. खैरे म्हणाले की, लाख काय पाच लाख लोक आले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. तुम्ही सभेला आलेल्या जमावालाच विचारा किती पैसे देण्यात आले, असा आरोप खैरे यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे ( रविवारी) औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेनंतर राजकीय वातावरण अधीक तापण्याची शक्यता आहे.
पत्रकारांनीच शोधून काढा
शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी पुन्हा मनसेच्या गर्दीवर भाष्य केले. ते म्हणाले, मनसेच्या सभेला लाख काय पाच लाख लोकं आले, तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्या जुन्या मित्रांच्या पाठिंब्याने ही गर्दी जमवली जात आहे. या गर्दीला कुणाची स्पाॅंसरशिप आहे. हे तुम्ही पत्रकारांनीच शोधून काढा. तेथील लोकांना विचारा, असे आवाहन चंद्रकांत खैरे यांनी केले.
( हेही वाचा: महागाईचा फटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ )
मला फोन आले होते
मनसेच्या सभेत लोक पैसे घेऊन येणार आहेत, ही माहिती देताना चंद्रकांत खैरे म्हणाले, मला स्वत: वैजापूरहून आणि औरंगाबादच्या ग्रामीण भागातून फोन आले. पाच हजार रुपये घ्या, चहा नाश्ता करा आणि सभेसाठी हजर राहा. अशी ऑफर त्यांना मिळाली. त्यामुळे ही गर्दी कोणत्या स्वरुपाची आहे, तुम्हीच ठरवा, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community