विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महापोलखोल सभेत बोलत असताना ‘बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तिथे नव्हता’, असे वक्तव्य केले. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली. मात्र त्याच्या काही तासांतच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत कसे याआधी राम मंदिराच्या विरोधात होते, याचे सप्रमाण पुरावे देत त्यांनी उघडे पाडले.
काय म्हणाले संजय राऊत?
बाबरी मशीद पाडली, तेव्हा शिवसेनेचा एकही नेता त्यावेळी उपस्थितीत नव्हता, असे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले. त्यांनी आधी सीबीआयचा अहवाल वाचावा, त्यामध्ये शिवसेनेच्या नेत्यांची नावे पहावीत. बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काय सहभाग होता, हे त्यांनी अभ्यासावे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
(हेही वाचा श्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या नावाने बनवली खोटी वेबसाईट)
काय म्हणाले नितेश राणे?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरी मशीद पाडली, त्याविषयी भाष्य केले. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांनी बाबरी मशिदी पाडली, त्यावर बोलणे हा हलकटपणाचा कळस आहे. तेव्हा ते सामानाचा पगार तरी घेत होते का? तर नाही. संजय राऊत तेव्हा लोकसत्तेच्या लोकप्रभामध्ये लिहीत होते. बाबरी मशीद पाडली, तेव्हा त्यांनी राम मंदिराच्या विरोधात २६ एप्रिल १९९२ रोजी ‘रामाची राजकीय फरफट’ हा लेख लिहिला, ते संजय राऊत त्यावर हलकटपणाने लिहीत आहेत, असे आमदार नितेश राणे म्हणाले.
एक आठवण .. @rautsanjay61 pic.twitter.com/Zq1kR4Nl7j
— nitesh rane (@NiteshNRane) May 2, 2022
Join Our WhatsApp Communityतुम्ही कुठे होता..@rautsanjay61 pic.twitter.com/V6R8hd99xV
— nitesh rane (@NiteshNRane) May 2, 2022